IN PICS: आलिया भट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 05:33 PM2022-02-03T17:33:44+5:302022-02-03T17:33:44+5:30

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातील अजय देवगणचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

'गंगूबाई काठियावाडी'मधील त्याचा फर्स्ट लूक शेअर करताना अजय देवगणने लिहिले आहे की, ‘अपनी पहचान से चार चांद लगाने आ रहे हैं हम. चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे…. (फोटो: इंस्टाग्राम)

या पोस्टरमध्ये अजय देवगणने डोक्यावर टोपी, पांढरा पँट-शर्ट, काळ्या चष्मासह हलक्या रंगाचा ब्लेझर घातलेला आहे. पोस्टरमध्ये अजय 'सलाम' करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या चित्रपटात आलिया भटने लहान वयातच वेश्याव्यवसायात ढकललेल्या मुंबईतील गंगूबाई काठियावाडीची भूमिका साकारली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आलिया भट्ट आणि अजय देवगणचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' 25 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आलिया भट्ट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये अजय देवगण, इमरान हाश्मी, विजय राज, सीमा पाहवा आणि इंदिरा तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत (फोटो: इंस्टाग्राम)