‘RRR’साठी रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलियानं किती फी घेतली माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 05:12 PM2022-03-25T17:12:19+5:302022-03-25T18:01:21+5:30

RRR : चित्रपटात आलिया भट सीतेच्या भूमिकेत आहे. आलियाने या चित्रपटात मोजून 20 मिनिटांची भूमिका साकारली आहे. पण...

एस.एस. राजमौलींचा बहुप्रतिक्षीत ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित झालाये आणि सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आलिया भट्ट, अजय देवगन, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा राजमौलींचा आणखी एक मास्टरपीस असल्याचं म्हटलं जातंय.

या चित्रपटाच्या बजेटबद्दल तुम्हाला ठाऊक आहेच. या चित्रपटावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला. अगदी एका रात्रीच्या शूटींगचा खर्चच 75 लाख होता.

अगदी रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरच्या एका एन्ट्री सीनवर किती खर्च व्हावा तर 25 कोटींचा. होय. कलाकारांनाही या सिनेमासाठी तगडी फी दिली गेली.

या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. दोघांनीही चित्रपटासाठी तगडी फी वसूल केली आहे. रिपोर्टनुसार, रामचरण याने 45 कोटी मानधन घेतलं.

ज्युनिअर एनटीआर यानेही रामचरण इतकीच म्हणजे 45 कोटी फी घेतली. चित्रपटात ज्युनिअर एनटीआरने कोमाराम भीम हे पात्र साकारलं आहे.

चित्रपटात आलिया भट ही सुद्धा सीतेच्या भूमिकेत आहे. आलियाने या चित्रपटात मोजून 20 मिनिटांची भूमिका साकारली आहे. पण या 20 मिनिटांच्या रोलसाठी आलियाने म्हणे 9 कोटी रुपए फी घेतल्याची चर्चा आहे.

अजयच्या फीचा आकडा वाचून तर तुमचे डोळे पांढरे होतील. होय, रिपोर्टनुसार, अजयने या चित्रपटासाठी 7 दिवस शूटींग केलं आणि या 7 दिवसांसाठी त्यानं 35 कोटी रुपए मानधन घेतलं.

दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी या चित्रपटासाठी फी घेतलेली नाही तर या चित्रपटाच्या नफ्यातील वाटा ते घेणार आहेत. होय, आरआरआरच्या नफ्यात त्यांची 30 टक्के भागीदारी असल्याचं कळतंय.