अभिनेत्रीने १० वर्षात दिला नाही 'हिट', ३७ वर्ष मोठ्या हिरोसोबत रोमान्स करुनही आपटला सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:44 IST2025-02-04T16:33:43+5:302025-02-04T16:44:39+5:30

नुकतंच ३४ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केला विचित्र डान्स

सिनेसृष्टीत मोठ्या वयाच्या अभिनेत्यांनी लहान अभिनेत्रींसोबत रोमान्स केला आहे. अनेकदा यावरुन टीकाही होते. सारख्या वयाच्या अभिनेत्रींना का घेतलं जात नाही अशीही चर्चा होते.

अशीच एक अभिनेत्रीने जिने २०१५ साली 'मिस दिवा- युनिव्हर्स' चा खिताब पटकावला. नंतर तिने मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला. काही सिनेमांमध्येही काम केलं मात्र आजपर्यंत एकही सोलो हिट दिला नाही.

ही अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला(Urvashi Rautela). २०१६ साली उर्वशीने 'सनम रे' सिनेमातून पदार्पण केलं. नंतर तिने 'ग्रेट ग्रँड मस्ती', 'सिंह साहब दी ग्रेट','पागलपंती','द लीजेंड' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं.

सिंह साहब दी ग्रेट सिनेमा उर्वशी आणि सनी देओलची जोडी होती. दोघांच्या वयात ३७ वर्षांचं अंतर आहे. हा सिनेमा जोरदार आपटला होता. तसंच ३७ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स केल्याने सनीवर टीकाही झाली होती.

उर्वशी आता पुन्हा चर्चेत आली होती.साऊथ स्टार नंदमुरी बालकृष्ण यांचा'डाकू महाराज' सिनेमा नुकताच रिलीज झाला. यामध्ये त्यांनी उर्वशी सोबत एक डान्स केला आहे ज्यावर जोरदार टीका होत आहे.

'डिबीडी डिबीडी' गाण्यात उर्वशी आणि नंदमुरी यांचे डान्स स्टेप्स खूपच विचित्र आहेत. तसंच उर्वशी नंदमुरी यांच्याहून ३४ वर्षांनी लहान आहे. मुलीच्या वयाच्या हिरोईनसोबत नंदमुरींनी केलेला डान्स पाहून त्यांच्यावर टीका होत आहे.

उर्वशी मनोरंजनविश्वात सतत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते. तिचं नाव भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतसोबतही जोडलं गेलं होतं. तिनेच याची चर्चा उठवली होती असं नंतर समोर आलं. रिषभ पंतने सर्व चर्चांचं खंडन केलं होतं.