रेखाच्या मुलाच्या भूमिकेत दिसलेली 'ही' मराठी अभिनेत्री, गाजवलं बॉलिवूड; आता कुठे गायब?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:51 IST2025-07-30T12:35:00+5:302025-07-30T12:51:02+5:30
ही अभिनेत्री मधल्या काळात वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहिली.

१९८१ साली आलेला श्याम बेनेगल दिग्दर्शित 'कलयुग' सिनेमा आठवतोय? या सिनेमाची स्टारकास्टही तगडी होती. राज बब्बर, शशी कपूर, रेखा, रीमा लागू यांची भूमिका होती.
या सिनेमाला १९८२ साली सर्वोत्तम सिनेमाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. दोन भावांमधील हेवेदावे, कुटुंबातील कारस्थान, कट आणि त्यातून होणारी भांडणं यावर सिनेमा आधारित होता.
महाभारत या महाकाव्याचे आधुनिक रुपांतर म्हणजे हा सिनेमा होता. यामध्ये सर्वांचीच कामं अफलातून होती. भारतीय सिनेमाच्या इतिहासातला सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून गणला जातो.
या सिनेमात एक बालकलाकारही होता. रेखाच्या मुलाची भूमिका त्याने साकारली होती. तो बालकलाकार मुलगा नाही तर मुलगी आहे. नंतर त्या चिमुकलीने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत.
बॉयकट केलेली क्युट हेअरस्टाईल, निरागस चेहरा अशा लूकमध्ये पाहून हा मुलगा नाही तर मुलगी आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. पण हे खरंय, ही आहे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर(Urmila Matondkar).
उर्मिलाने लहानपणापासूनच अभिनयाला सुरुवात केली होती. 'कर्म','जाकूल','मासूम','सूर संगम','भावना','बडे घर की बेटी','तुम्हारे शहर','डकैत' या सिनेमांमध्येही ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली.
१९७७ ते १९८८ पर्यंत ती १० सिनेमांमध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केलं. १९८९ साली ती मल्याळम सिनेमातही झळकली. हिंदी आणि साउथ मिळून ती ६० सिनेमांमध्ये दिसली आहे.
१९९१ साली उर्मिलाने सनी देओलच्या 'नरसिम्हा' सिनेमातून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. तिचे 'रंगीला', 'सत्या', 'खूबसूरत', 'दीवाने','हसीना मान जाएगी','भूत' असे अनेक सिनेमे गाजले.
उर्मिला मध्यंतरी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. राजकारणात प्रवेश, १० वर्ष छोच्या मोहसीन अख्तरसोबत लग्न, मग घटस्फोट यामुळे ती प्रसिद्धीझोतात होती. आज वयाच्या ५१ व्या वर्षी उर्मिला ग्लॅमरस दिसते मात्र ती मोठ्या पडद्यावरुन गायबच आहे.