'ही' अभिनेत्री आठवतेय का? सिनेविश्वापासून दूर गेली; आता ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 12:53 IST2025-09-11T12:02:17+5:302025-09-11T12:53:04+5:30

हिंदी, साउथमध्ये काही सिनेमे केल्यानंतर आता कुठे गेली ही अभिनेत्री?

२३ वर्षांपूर्वी आलेला 'मेरे यार की शादी है' सिनेमा आठवतोय? यातली गाणी प्रचंड गाजली. जिमी शेरगील, उदय चोप्रा आणि ट्युलिप जोशी यांची त्रिकोणी लव्हस्टोरी होती.

मनोरंजनविश्वातील अशा अनेक अभिनेत्री काही सिनेमे केल्यानंतर जणू गायबच झाल्या. कोणाचे सिनेमे आपटले तर कोणी संसारात व्यग्र झालं.

ट्युलिप जोशी खूप दिवसांनी नाव वाचलं असेल.'दिल मांगे मोर','मारिया','धोखा' या सिनेमांमध्येही तिने काम केलं. काही जाहिरातींमध्येही तिने काम केलं. तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि पंजाबी सिनेमांमध्येही ती दिसली.

ट्युलिप आता बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीतून गायब आहे. ती सोशल मीडियावरही फारशी सक्रीय दिसत नाही. तसंच तिचे लेटेस्ट फोटो पाहून तिला ओळखताही येणं कठीण आहे.

स्क्रीनपासून दूर जात ट्युलिप मेडिटेशन, स्पिरिच्युअल मार्गाला लागली. ती मेडिटेशन फॅसिलिटेटर आणि वेदिक कन्सल्टंट असल्याचं तिने इन्स्टाग्राम बायोमध्ये लिहिलं आहे.

ट्युलिप सतत मेडिटेशन, योग आणि त्या संबंधित व्हिडिओ पोस्ट करत असते. तिची स्वत:ची एक वेबसाईटही आहे ज्यावर ती याचे धडे देते.

आज ट्युलिप ४६ वाढदिवस साजरा करत आहे. सध्या ती परदेशात स्थायिक असल्याचं तिच्या सोशल मीडियावर पोस्टवरुन दिसतं.