बच्चन कुटुंबाची सून आहे 'ही' अभिनेत्री, दोन वर्ष न्यूयॉर्कच्या जेलमध्ये राहिली कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:28 IST2025-02-06T15:15:09+5:302025-02-06T15:28:21+5:30
अभिनेत्रीचा ओटीटी विश्वात दबदबा आहे. तिच्या अभिनयाचं नेहमीच खूप कौतुक होतं.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन तर सगळ्यांनाच माहित आहे. मात्र त्यांची आणखी एक सून आहे जी अभिनेत्री आहे.
ही आहे अभिनेत्री तिलोत्तमा शोम (Tillotama Shome). तिलोत्तमा ओटीटी विश्वात लोकप्रिय आहे. तिच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पण ही बच्चन कुटुंबाची सून कशी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
तर जया बच्चन यांची बहीण रीता भादुरी यांची तिलोत्तमा सून आहे. रीता भादुरी यांचा मुलगा कुणालची ती बायको आहे. जया बच्चन या कुणालच्या मावशी. या नात्याने तिलोत्तमा त्यांची आणि अमिताभ बच्चन यांची सून झाली.
तिलोत्तमा आणि कुणालने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नात अभिषेक बच्चनही ऐश्वर्या आणि आराध्यासह सहभागी झाला होता.
तिलोत्तमाने न्यूयॉर्कमध्ये तुरुंगातील कैद्यांच्या सायकॉलॉजीचा अभ्यास केला आहे. यासाठी ती न्यूयॉर्कच्या आयलैंड जेलमध्ये काही दिवस राहिली देखील आहे. खुनाचा आरोप असलेल्या कैद्यांशी ती बोलली आहे.
तिलोत्तमा म्हणते की ती जेलमध्ये राहुनच अभिनय शिकली. तिने कधीच अभिनयाचं अधिकृत प्रशिक्षण घेतलं नाही. जेलमध्ये असताना तिला आरोपींना भेटता आलं आणि त्यांना जवळून समजून घेता आलं. तिला माणसं कळतात असंही ती म्हणाली होती.
तिलोत्तमाने 'मान्सून वेडिंग'मधून अभिनयाला सुरुवात केली. 'सर' या सिनेमासाठी तिला फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्ड मिळाला होता. तिने नुकतीच 'पाताल लोक २' मध्येही नागालँडच्या पोलिस अधिकारीची भूमिका साकारली.
तिलोत्तमा मूळ कोलकाताची आहे. अनुपम आणि बैसाखी शोम यांची ती मुलगी आहे. तिने 'लस्ट स्टोरी २','अ डेथ इन द गुंज' या प्रोजेक्ट्समध्येही काम केलं आहे.