वयाच्या ४० व्या वर्षी अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई; स्टायलिश अंदाजात केलं 'मॅटर्निटी' फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:26 IST2026-01-20T17:12:06+5:302026-01-20T17:26:48+5:30
वयाच्या ४० व्या वर्षी बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने ती दुसऱ्यांदा आई होणार, ही घोषणा केली. आज या अभिनेत्रीने बेबी बंब फ्लॉन्ट करत खास फोटोशूट केलं.

ही अभिनेत्री आहे सोनम कपूर. सोनमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अतिशय रॉयल आणि स्टायलिश अंदाजात तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे

सोनमने केलेल्या या 'मॅटरनिटी स्टाईल'चे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. या लेटेस्ट फोटोशूटसाठी सोनमने संपूर्ण काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे.

सोनमने काळ्या रंगाच्या हाय-नेक क्रॉप टॉपसोबत एक लांब पेन्सिल स्कर्ट आणि वरून मॅचिंग ब्लेझर स्टाईल केला आहे. तिचा हा लूक तिची बहीण आणि प्रसिद्ध स्टायलिस्ट रिया कपूर हिने तयार केला आहे.

या ड्रेससोबत सोनमने डायमंड पेंडंट, कमरेला नाजूक चैन आणि काळ्या रंगाची 'हर्मेस' (Hermès) बॅग कॅरी केली असून तिचा हा ग्लॅमरस अवतार पाहण्यासारखा आहे.

: हे फोटो शेअर करताना सोनमने "मम्मा डे आउट" असे कॅप्शन दिले आहे. सोनमच्या या फोटोंवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनमची जवळची मैत्रीण स्वरा भास्कर, मृणाल ठाकूर आणि चाची महीप कपूर यांनी या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करून आपले प्रेम व्यक्त केले आहे

















