सलमानच्या 'या' अभिनेत्रीने सोडली फिल्म इंडस्ट्री, दुबईतल्या रिअल इस्टेटमध्ये केला प्रवेश; कोण आहे ही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:58 IST2026-01-21T14:44:49+5:302026-01-21T14:58:44+5:30
अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो पाहून व्हाल थक्क, बोटॉक्समुळे नेटकऱ्यांनी केलेलं ट्रोल

मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार काही हिट सिनेमे देऊन आज गायब झाले आहेत. फिल्म इंडस्ट्री सोडून ते आपापल्या आयुष्यात रमले आहेत.

'पापा कहते है'फेम अभिनेत्री मयुरी कांगोने आज कॉर्पोरेट क्षेत्रात नाव कमावलं आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री आयेशा टाकियाही फिल्म इंडस्ट्री सोडून बिझनेस करत आहे.

अशीच आणखी एक अभिनेत्री जिने सलमान खान, अक्षय खन्ना, अजय देवगण, अभिषेक बच्चन अशा अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. तिने आज दुबईत रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश केला आहे.

ही अभिनेत्री आहे रिमी सेन. सलमानसोबतचा 'क्योंकी', अक्षय खन्नासोबतचा 'हलचल',अभिषेकसोबत 'धूम' अशा अनेक सिनेमांमुळे रिमी सेन हे नाव बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झालं होतं.

मात्र अचानक ती इंडस्ट्रीतून गायब झाली. काही वर्षांनी तिचे सोशल मीडियावर काही फोटो समोर आले. त्यात तिने केलेलं बोटॉक्स पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. तिचा बदललेला लूक पाहून अनेकांनी तिला ओळखलंच नाही.

आता रिमीने नुकतीच दुबईत मुलाखत दिली. तिने रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश केल्याचा खुलासा केला. सध्या दुबई हे रिअल इस्टेट व्यवसायासाठी सर्वात बेस्ट असल्याचं ती म्हणाली.

"दुबई सर्वांचच मनापासून स्वागत करते. इथे ९५ टक्के लोक परदेशी आहेत तर इतर लोक इथलेच आहेत. इथे मंदिर आहे मस्जिदही आहे. इथे लोकांची जीवनशैली, आयुष्य सुखकर असावं यावरच लक्ष दिलं जातं. म्हणून दुबई सगळ्याच बाबतीत उत्कृष्ट आहे."

रिमी ४४ वर्षांची असून तिने अद्याप लग्न केलेलं नाही. दुबईत सध्या ती सिंगल आयुष्य जगत आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.

















