बाबो..! अभिनेत्री Rekha यांना चक्क महिलेसोबत करायचं होतं लग्न, सिमी ग्रेवालच्या शोमध्ये केला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 08:00 AM2023-01-19T08:00:00+5:302023-01-19T08:00:00+5:30

Rekha : बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचे प्रोफेशनल लाइफ इतकंच त्यांचं खासगी आयुष्यदेखील चर्चेत आले आहे.

बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री रेखा यांचे खासगी आयुष्य वादग्रस्त ठरले होते. रेखा यांच्या प्रोफेशनल लाइफबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे पण त्यांची लव्ह लाईफ गूढपेक्षा कमी नाही.

एकीकडे रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरची चर्चा खूप गाजत असतानाच दुसरीकडे जेव्हा रेखा यांनी मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

मात्र, रेखा यांचे मुकेश यांच्यासोबतचे नातेही फार काळ टिकले नाही कारण लग्नानंतर लगेचच मुकेश यांनी आत्महत्या केली. या कारणास्तव रेखा यांना कधीही प्रेम न मिळाल्याची खंत होती आणि त्यांनी तिच्या मुलाखतींमध्येही याचा उल्लेख केला आहे.

दुसरीकडे, रेखा जेव्हा सिमी ग्रेवालच्या शोमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या लव्ह लाईफवर मोकळेपणाने चर्चा केली. यादरम्यान रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेम तर व्यक्त केलेच, पण दुसऱ्यांदा लग्न करण्याबाबतही जबरदस्त प्रतिक्रिया दिली.

रेखा यांच्या या मुलाखतीमुळे बरीच चर्चा झाली. आता अलीकडेच रेखा यांच्या सिमी ग्रेवाल यांच्या मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला चाहते जबरदस्त प्रतिसाद देत आहेत.

जेव्हा सिमी ग्रेवाल यांनी रेखा यांना विचारले की त्या पुन्हा लग्न करणार का? यावर अभिनेत्रीने सिमी यांना विचारले की, "कोणासोबत, पुरुषासोबत का?" रेखा यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सिमी म्हणाल्या, हे उघड आहे की महिलेसोबत तर नाही.

दुसरीकडे, सिमींचे म्हणणे ऐकून रेखा यांनीही सडेतोड उत्तर देताना म्हटले की, "का नाही. माझ्या मनात मी स्वतःशी, माझ्या प्रोफेशनशी आणि माझ्या प्रियजनांशी लग्न केले आहे.

तर या मुलाखतीत सिमी ग्रेवाल यांनी रेखा यांना विचारले की, फक्त पुरुषच स्त्रीला सुरक्षा देऊ शकते का?

तर त्यावर रेखा म्हणाल्या की या गोष्टीचा पुरुषाशी काहीही संबंध नाही. हे फक्त स्त्री कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे यावर अवलंबून असते.

सिमी ग्रेवाल यांच्या शोचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

रेखा ६८ वर्षांच्या झाल्या आहेत पण आजही त्यांच्या सौंदर्यावर चाहते फिदा आहेत.

रेखा आताश: चित्रपटात दिसत नाहीत. पण रिअ‍ॅलिटी शो व अवार्ड फंक्शनमध्ये मात्र अधूनमधून त्या पाहायला मिळतात.