Photos: तू चीज बड़ी है... रवीना टंडनची लेक राशा थडानीचा किलर लूक, चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:30 IST2025-01-17T18:18:04+5:302025-01-17T18:30:58+5:30

अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी तिच्या आगामी 'आझाद' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.
तिचा हा चित्रपट आज १७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला आहे.
राशाचा हा पहिलाच चित्रपट आहे. राशानं या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
त्यामुळे इंडस्ट्रीत सगळीकडे तिच्या नावाची चर्चा रंगली आहे.
नुकतेच राशाने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये राशा खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
वेगवेगळ्या पोझ देत तिनं हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत.
राशा ही बॉलिवूडमधील सर्वात हॉट स्टार किड्सपैकी एक आहे.
'आझाद' या चित्रपटात राशासोबत अमन देवगण मुख्य भूमिकेत आहे. तो अजय देवगणचा पुतण्या आहे.
राशा आणि अमन देवगण या दोघांची नवी रोमँटिक जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.