मराठमोळ्या अभिनेत्रीचं Cannes Film Festival मध्ये पदार्पण, रेड कार्पेटवर दाखवणार जलवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 03:36 PM2023-05-16T15:36:26+5:302023-05-16T15:42:34+5:30

ही मराठमोळी अभिनेत्री, धुळ्याची 'सीता' थेट Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरणार आहे.

सर्वात प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्स पैकी एक म्हणजे कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival 2023). यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात होत आहे. अनेक तारेतारका आपल्या ग्लॅमरस फॅशनसह रेड कार्पेटवर अवतरणार आहेत. जगभरातील शॉर्टलिस्ट केलेले अनेक चित्रपट याठिकाणी दाखवण्यात येतात.

कान्स फिल्म फेस्टिव्हल हा फ्रान्समध्ये होणारा फिल्म फेस्टिव्हल असून अत्यंत मानाचा आहे. भारताकडून आतापर्यंत प्रियंका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, मल्लिका शेरावत, सोनम कपूर यांनी फेस्टिव्हलमध्ये चार चॉंद लावले आहेत.

यंदा अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हे कान्समध्ये पदार्पण करणार आहेत. याशिवाय अभिनेत्री सारा अली खान सुद्धा कान्सला पोहोचणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान एक मराठमोळी अभिनेत्री देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे.

'सीतारामम' सिनेमातून सर्वांनाच आपल्या सौंदर्याने भुरळ पाडणारी अभिनेत्री मृणाल ठाकुर (Mrunal Thakur) कान्समध्ये पदार्पण करण्यासाठी खुपच आतुर आहे. जगभरातील फिल्ममेकर्सना भेटण्यासाठी खूप उत्सुक असल्याचं तिने म्हटलं आहे.तसंच संधीचं नवं दार तिच्यापुढे खुलं झालं आहे याचाही तिला आनंद आहे.

मृणाल नक्कीच आपल्या फॅशनने सर्वांचं मन जिंकेल यात शंका नाही. तिच्या पदार्पणाकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. १७ ते १९ मे मध्ये होणाऱ्या या फिल्म फेस्टिव्हलसाठी मृणाल सज्ज आहे. ही मराठमोळी अभिनेत्री थेट कान्समध्ये आपला जलवा दाखवणार आहे.

मृणाल प्रसिद्ध फॅशन डिझायनर फाल्गुनी शेन पिपॉकसोबत डेब्यू करत आहे. या फेस्टिव्हलमध्ये ती ग्रे गूज (Grey Goose) ला प्रमोट करताना दिसणार आहे.

मृणालने मराठी , हिंदी मालिकांमधून अभिनयाला सुरुवात केली. यानंतर हळूहळू तिने सिनेक्षेत्रात नशीब आजमवायला सुरु केले. नुकतीच ती आदित्य रॉय कपूरसोबत 'गुमराह' या सिनेमात दिसली. तर आता मृणाल ईशान खट्टरसोबत 'पिप्पा' या सिनेमात दिसणार आहे.

मृणालला 'सीतारामम' सिनेमामुळे खरी ओळख मिळाली. तिच्या अभिनयाचं आणि सौंदर्याचं खूप कौतुक झालं. आता तिच्यासमोर आणखी बऱ्याच संधींची दारं खुली झाली आहेत.