साडीत खुललं कंगनाचं सौंदर्य, फोटो पाहून चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 06:01 PM2024-02-11T18:01:26+5:302024-02-11T18:25:08+5:30

अभिनेत्री कंगनाने निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे.

आपल्या बिधास्त विधानांनी सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत.

कधी सिंपल साडीत तर कधी रॉयल लुकमध्ये कंगना पाहायला मिळते.

भारतीय पारंपारिक कपड्यात ती खूपच सुंदर दिसते.

कंगना सोशल मीडियावर सक्रिय असते. ती कायम आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतेच कंगनाने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्रीने निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. कंगनाने हा लूक रेट्रो पद्धतीचा ठेवला आहे.

कंगनाचा हा लूक ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांच्या लूकवरून प्रेरित असल्याचं तिनं सांगितलं.

तिचा हा लुक रॉयल वाइब्स देत आहे. यावेळी तिच्या कपड्यांमध्ये ग्लॅमर आणि पारंपारिकतेचा परफेक्ट मिलाफ पाहायला मिळत आहे. अनेकांनी तिच्या या लुकची प्रशंसा केली आहे.

क्वीन कंगना रणौत तिच्या सोशल मीडिया हँडलवर नेहमीच चांगले फोटो शेअर करते.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्ल बोलायचे झाल्यास, अलिकडेच तिचा ‘तेजस’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात कंगना 'पायलट'च्या भूमिकेत पाहायला मिळाली.

तसेच ती आता 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ती स्वतः करत आहे. यात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.