या प्रसिद्ध अभिनेत्रीचं वयाच्या 1४ व्या वर्षी झालं लैंगिक शोषण,कारण वाचून तुम्हीही हादरुन जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 18:38 IST2021-04-01T18:34:07+5:302021-04-01T18:38:20+5:30
Salman Khan's ex-girlfriend Somy Ali: जगभरातील महिलांच्या अधिकारांसाठी काम करते. सोमीच्या या संस्थेचे हजारो सदस्य आहेत.

मुळात तिच्या खासगी जीवनाविषयी कुणालाच फारसं माहित नाही. प्रत्येकाकडे खासगी जीवनाविषयी उलटसुलट माहिती आहे.

सोमीने एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. ती 14 वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार झाला होता.

ती पाकिस्तानात लहानाची मोठी झाली. ती पाच वर्षांची असताना तिच्या कूकने तिच्यावर तीनदा लैंगिक अत्याचार केला होता.

तर ती नऊ वर्षांची असताना सुरक्षारक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

एवढेच नाही तर ती 14 वर्षांची असताना अमेरिकेतील एका पार्कमध्ये एका 17 वर्षांच्या मुलाने तिच्यावर बलात्कार केला होता.

जेव्हा माझ्या पालकांना याविषयी सांगितले तेव्हा त्यांनी याविषयी कुठे काही बोलू नको असं बजावलं होतं.

तिच्या आयुष्यात घडलेल्या या घटनांमुळेच तिनेच नो मोअर टीअर्स ही संस्था स्थापन केली.

२००६ मध्ये सोमीने महिलांच्या अधिकारांसाठी काम करायला सुरुवात केली आणि नो मोअर टीअर्स नावाची संस्था स्थापन केली.

वयाच्या पाचव्या वर्षी सोमीवर लैंगिक अत्याचार झाला होता. हेच ही संस्था सुरू करण्यामागचे खरे कारण होते.

आता सोमी जगभरातील महिलांच्या अधिकारांसाठी काम करते. सोमीच्या या संस्थेचे हजारो सदस्य आहेत.

















