आमिर खानची मुलगी इरा नव्या घरात झाली शिफ्ट, लॉकडाऊनमध्ये वडिलांसोबत स्पेंट केला क्वॉलिटी टाईम-PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 05:39 PM2020-07-04T17:39:14+5:302020-07-04T17:39:14+5:30

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिने नवीन घराचे फोटो शेअर केले आहेत. (PHOTO INSTAGRAM)

लॉकडाऊन दरम्यान इरा वडील आमिर खानसोबत राहत होती. पण आता ती तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे, ज्याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (PHOTO INSTAGRAM)

या फोटोंमध्ये इरा तिच्या घरात दिसते आहे. फोटोंमध्ये शेल्फच्या शिवाय काही पेंटिंग्जदेखील दिसतात. फोटोवरुन अंदाज लावू शकतो की ही इराची स्टडीरुम आहे.(PHOTO INSTAGRAM)

इरा खानला दिग्दर्शिका व्हायचं आहे. तिला कॅमेरा मागे राहून काम करायला खूप आवडते. (PHOTO INSTAGRAM)

इराचे वडील आमिर खानबरोबर याच्यासोबत एक स्पेशल बॉन्डिंग आहे. आमिरसोबतचे फोटो ती नेहमी शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)