आई तमिळ तर वडील आयरिश, आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट नक्की काय करते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 15:21 IST2025-03-14T15:15:19+5:302025-03-14T15:21:08+5:30
गौरी स्प्रॅट बंगळुरु आणि आता मुंबईत नक्की काय काम करते माहितीये का?

अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आज ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच काल त्याने सर्वांना मोठं सरप्राईज दिलं. आमिर खान रिलेशनशिपमध्ये असून त्याने गर्लफ्रेंडला गौरी स्प्रॅटला माध्यमांसमोर आणलं.
दोन घटस्फोटांनंतर आता आमिर तिसऱ्यांदा प्रेमात पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आमिर खानच्या गर्लफ्रेंडचं नाव गौरी असून तो गेल्या दीड वर्षांपासून तिच्यासोबत आहे. विशेष म्हणजे २५ वर्षांपासून दोघं एकमेकांना ओळखत आहेत.
आमिरची गर्लफ्रेड गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) नक्की आहे तरी कोण? ती काय काम करते? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. जाणून घेऊया गौरी स्प्रॅटबद्दल...
गौरी स्प्रॅट बंगळुरुची रहिवासी आहे. सध्या ती आमिर खानच्या प्रोडक्शनमध्येच काम करते. लिंक्डइन प्रोफाईलनुसार, गौरीने २००२ ते २००४ काळात लंडनच्या आर्ट्स युनिव्हर्सिटीमधून फॅशन, स्टायलिंग अँड फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं.
तसंच बी ब्लंट हेअरड्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ती पार्टनर आणि डायरेक्टर पदावर आहे. गौरी सध्या आमिर खान प्रोडक्शनमध्ये काम करते.
गौरीची आई रीता स्प्रॅट या तमिळ आहेत. बंगळुरूत त्यांचं स्वत:चं सलून आहे. गौरीचे वडील आयरिश आहेत. तिचे आजोबा स्वातंत्र्यसेनानी होते. तसंच गौरीला ६ वर्षांचा एक मुलगा आहे. तिला एक बहीणही आहे जी तिच्या सारखीच दिसते.
आमिर खानने गौरीची ओळख त्याच्या कुटुंबाशीही करुन दिली. आमिरच्या कुटुंबाने खुल्या मनाने आपलं स्वागत केल्याचं गौरी एका मुलाखतीत म्हणाली.