PHOTO: 'ग्लॅमरस गर्ल' रकुल प्रीत सिंह; डिझायनर लेहेंग्यात केलं सुंदर फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:49 IST2024-11-06T15:35:14+5:302024-11-06T15:49:30+5:30
नुकतेच अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत रकुलने आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टी ते बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीने तिच्या मेहनतीच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
२०१४ मध्ये आलेल्या 'यारियॉं' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.
रकुलने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये डिझायनर लेहेंगा परिधान करून अभिनेत्री त्यामध्ये फारच सुंदर दिसते आहे.
"I feel like a Diwali diya"असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
रकुलने 'यारियॉं' चित्रपटानंतर 'सरदार का नातू', 'शिमला मिर्ची', 'आय लव्ह यू', 'रनवे 34', 'डॉक्टर जी', 'छत्रीवाली' आणि 'दे दे प्यार दे' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली.