टीबीने हिरावलं सौंदर्य, सासरच्या मंडळींनीही सोडली साथ, मरणाच्या दारातून परत आलीये 'ही' अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:12 IST2025-06-25T14:02:39+5:302025-06-25T14:12:23+5:30
आजारपणामुळे उद्धवस्त झालं करिअर; वाईट पतीनेही सोडली साथ; सलमानची 'ही' अभिनेत्री जगतेय असं आयुष्य

सिनेसृष्टीत करिअर करायचं, यश मिळवायचं हे अनेकांचं स्वप्न असतं. काहींना इथे यश मिळते तर अनेकांना खूप संघर्ष करावा लागतो. त्यातील काहींना रातोरात स्टारडम मिळतो आणि अचानक ते इंडस्ट्रीतून गायब होतात.
परंतु, अशी एक अभिनेत्रीचं करिअर एका आजारामुळे उद्धवस्त झालं, त्यानंतर तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. ही अभिनेत्री पूजा डडवाल. एकेकाळी सौंदर्यासाठी ओळखली जाणाऱ्या अभिनेत्रीचं करिअर आजारपणामुळे डबघाईला आलं.
पूजाने 'वीरगती' चित्रपटात सलमानसोबत पाहायला मिळाली. परंतु, पूजा कित्येक वर्षांपासून इंडस्ट्रीपासून लांब आहे. २०१९ मध्ये पूजा डडवाल चर्चेत आली होती.पूजाला टीबी झाला होता. त्याचा तिच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाली. त्यात आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तिच्याकडे या जीवघेण्या आजाराच्या उपचारासाठी पैसे नव्हते.
पूजा डडवालला चित्रपटांमध्ये चांगल्या ऑफर्स न मिळाल्याने तिने मालिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला. साल १९९९ मध्ये ‘आशिकी’ आणि २००१ मध्ये ‘घराना’ मध्ये दिसली होती. दोन हिट टीव्ही शो दिल्यानंतरही तिला चांगल्या ऑफर्स मिळल्या नाहीत.
त्यानंतर अभिनेत्रीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. पूजा झाल्यानंतर पतीसोबत गोव्याला शिफ्ट झाली. पूजाने तिच्या पतीचा गोव्यातील कॅसिनोही सांभाळला. २०१८ मध्ये पूजा आजारी पडू लागली. त्यावेळी क्षयरोगाने तिला ग्रासल्याचे आढळून आलं.
पूजाच्या प्रकृतीची माहिती पूजाच्या सासरच्या मंडळींना आणि तिच्या पतीला मिळताच त्यांनी तिच्यासोबतचं नातं संपवलं.
पूजा डडवाल मुळची मुंबईची आहे. ५ जानेवारी १९७७ रोजी तिचा जन्म झाला. तसंच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झालं. तिला लहानपणापासूनच सिनेमाची आवड होती आणि मोठं झाल्यावर तिला अभिनय क्षेत्रात नाव कमवायचं होतं.