बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 18:41 IST2025-07-23T18:25:32+5:302025-07-23T18:41:48+5:30
बॉयफ्रेंडला धोका दिल्याची जोरदार चर्चा रंगली.

चित्रपटांपेक्षा कलाकारांच्या लव्ह लाईफबद्दल जास्त चर्चा आहेत. टीव्ही असो किंवा बॉलिवूड... असे अनेक कपल आहेत जे नेहमीच चर्चेत राहून लक्ष वेधून घेतात. तर काहीचे लग्नाआधीच ब्रेकअप होतात.
बिग बॉस ओटीटी १ विनर दिव्या अग्रवाल अनेक वर्षे तिचा बॉयफ्रेंड वरुण सूदसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. पण नंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी तिला खूप ट्रोल केलं.
दिव्याने बॉयफ्रेंडला धोका दिल्याची जोरदार चर्चा रंगली होती. यानंतर दिव्याने अपूर्व पाडगावकर या उद्योगपतीशी लग्न केलं. लग्नानंतर दोघांचे फोटो, व्हिडीओ आणि इंटरव्ह्यू हे खूप व्हायरल झाले होते.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने सांगितलं होतं की, तिचा नवरा सुरुवातीला या लग्नासाठी तयार नव्हता. आजही तो लग्नाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवत नाही. पण आम्ही एकत्र आनंदी आहोत.
अभिनेत्रीने हे सांगितल्यानंतरच ती पतीपासून वेगळी राहत असल्याच्या बातम्या येत आहेत. पण अभिनेत्रीने त्यावर अद्याप कोणतंही भाष्य केलेलं नाही. दिव्या सध्या ओटीटीवर काम करत आहे.
दिव्या अग्रवाल बॅडएस बेगम सीरीजमध्ये दिसली होती. याशिवाय, ती प्रिन्स नरुलासोबत एका म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली आहे. दिव्या अग्रवाल सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे.
इंस्टाग्रामवर दिव्याला २.८ मिलियन लोक फॉलो करतात. ती अनेकदा तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस फोटोंमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेते.
दिव्याने एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला १० पासून सुरुवात केली. नंतर 'एस ऑफ स्पेस १' आणि बिग बॉस ओटीटी १ ची विजेती ठरली. 'रागिनी एमएमएस: रिटर्न्स २' पासून अभिनयाला सुरुवात केली.