Bigg Boss Marathi 6: कातिलों की कातिल राधा पाटील ते सोनावणे वहिनी; 'बिग बॉस मराठी ६'मधल्या कन्फर्म स्पर्धकांची लिस्ट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:00 IST2026-01-09T17:12:16+5:302026-01-09T18:00:45+5:30

Bigg Boss Marathi 6 Contestants List: 'बिग बॉस मराठी ६'मधील काही स्पर्धकांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर काही स्पर्धक बिग बॉसच्या घरात सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६' हे नवं पर्व ११ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

'बिग बॉस मराठी ६'मधील काही स्पर्धकांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर काही स्पर्धक बिग बॉसच्या घरात सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दिपाली सय्यद : अभिनयानंतर राजकारणात गेलेल्या दिपाली सय्यद यंदा 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात दिसणार आहेत. कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये त्यांची झलक चाहत्यांना दिसली आहे.

राकेश बापट : हिंदी बिग बॉस गाजवलेला राकेश बापट आता 'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार आहे. राकेश बापटची एन्ट्री कन्फर्म झाली आहे.

करण सोनावणे : प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करण सोनावणे 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात दिसणार आहे. त्याचा प्रोमोही समोर आला आहे.

अनुश्री माने : करण सोनावणेसोबत इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेदेखील 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात दिसण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.

श्रेयस तळपदे : मराठी अभिनेता श्रेयस तळपदे 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.

सोनाली राऊत : अभिनेत्री आणि मॉडेल सोनाली राऊतही 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री घेणार आहे. पहिल्याच प्रोमोमध्ये चाहत्यांना तिची झलक दिसली आहे.

राधा पाटील मुंबईकर : लावणी डान्सर राधा पाटील मुंबईकरही 'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार आहे. राधा पाटीलचं नाव कन्फर्म करण्यात आलं आहे.

आयुष संजीव : अभिनेता आयुष संजीवही 'बिग बॉस मराठी ६'चा कन्फर्म स्पर्धक आहे. आयुषचं नावही प्रचंड चर्चेत आहे.