लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही दिपाने जपलाय तिचा साधेपणा, नेटकऱ्यांमध्ये होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 15:28 IST2024-02-09T15:21:46+5:302024-02-09T15:28:01+5:30
deepa parab chaudhari: कोणताही मोठेपणाचा आविर्भाव न बाळगता दिपा सर्वसामान्यांसारखीच राहते. यात अलिकडेच तिने काही फोटो शेअर केले त्याची सध्या चर्चा रंगली आहे.

'तू चाल पुढं' या मालिकेच्या माध्यमातून कलाविश्वात कमबॅक करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिपा परब-चौधरी.
उत्तम अभिनय आणि सोज्वळपणा यांच्या जोरावर दिपाने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर तिची छाप पाडली.
बाईपण भारी देवा या गाजलेल्या सिनेमातही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
दिपा सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे प्रोफेशनल आणि पर्सनल या दोन्ही आयुष्याविषयीचे अपडेट ती चाहत्यांना देत असते.
नुकतेच दिपाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिच्या साध्या पण तितक्याच सुंदर लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दिपाने पिवळ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट असलेला सुरेख ड्रेस परिधान केला आहे.
दिपाचे हे फोटो वाऱ्यासारखे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.