ॲटिट्यूड हो तो एैसा! माधुरी पवारच्या बिनधास्त अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 18:23 IST2023-12-01T18:10:59+5:302023-12-01T18:23:54+5:30
Madhuri pawar: वहिनीसाहेबांनी नुकतंच एक भन्नाट फोटोशूट केलं आहे.

'देवमाणूस', 'तुझ्यात जीव रंगला' या आणि अशा अनेक मालिका, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली अभिनेत्री म्हणजे माधुरी पवार.
उत्तम अभिनयशैली आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर माधुरीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. परंतु, माधुरीचा हा प्रवास सोपा नव्हता.
अत्यंत गरीब कुटुंबातून माधुरी वर आली असून तिने तिच्या हिमतीवर तिचं सारं विश्व निर्माण केलं आहे.
माधुरी आज मराठी कलाविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
सोशल मीडियावर माधुरीचा चांगला वावर आहे. त्यामुळे अलिकडेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची बिनधास्त दिसत आहे.
माधुरीने या फोटोंमध्ये फूल अॅटिट्यूडमध्ये पोझ दिल्या आहेत. सोबतच Just look at me असं कॅप्शनही दिलं आहे.
माधुरीचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.
माधुरीने मालिका, सिनेमांसह वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. अलिकडेच ती रानबाजर या वेबसीरिजमध्ये झळकली होती. त्यानंतर आता ती लंडन मिसळ या आगामी सिनेमात झळकणार आहे.