लग्नाआधीच अनवाँटेड प्रेग्नेंसीची तारक मेहताच्या अभिनेत्रीला सतावत होती भीती, स्वतःच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 15:07 IST2021-05-21T15:02:46+5:302021-05-21T15:07:55+5:30
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये नुकताच अभिनेत्री आराधना शर्माची एन्ट्री झाली आहे. मालिकेत ती डिटेक्टीव्हची भूमिका साकारत आहे.

गेल्या काही दिवसांपासून आराधना शर्मा तिच्या खाजगी कारणामुळे चर्चेत आहे.
खुद्द आराधनानेच खुलासा करत सगळ्यांनाचा मोठा धक्का दिला आहे.
आराधनाच दीड वर्ष बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहात होती.
त्याच दरम्यान आराधनाला ती प्रेग्नंट असल्याची भीती तिला सतावत होती.
या भीतीमुळे ती इतकी अस्वस्थ झाली होती की, सतत हाच विचार ती करायची.
प्रेग्नंट नसल्याचे कळताच तिचा जीवात जीव आल्याचे तिने सांगितले.
शेवटी या गोष्टीवरुन लक्ष हटवत तिने तिच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.
आराधना शर्मा एमटीव्हीच्या 'स्प्लीटसविला'या शोमध्येही झळकली आहे.
तसेच तिने अनेक ब्रँडसाठी मॉडेलिंगही केले आहे.
आराधना ही खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहे.
सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला या गोष्टीचा अंदाज येईलच.
विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.