अनुपम खेर यांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क, फिटनेसमध्ये अनिल कपूरला देताहेत टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 15:28 IST2022-03-07T15:28:48+5:302022-03-07T15:28:48+5:30

अनुपम खेर (Anupam Kher) आज ६७वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी वाढदिवसादिवशी एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून सर्व थक्क झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर आज त्यांचा ६७वा वाढदिवस साजरा करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

वाढदिवसाच्या निमित्ताने अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटो शेअर करत त्यांनी स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, हॅप्पी बर्थडे टू मी. आज जेव्हा मी माझे ६७ वर्षात पदार्पण करतो आहे. मी माझे नवीन उद्देश सादर करण्यासाठी प्रेरीत आणि उत्सुक आहे.

अनुपम खेर यांनी पुढे लिहिले की, मी माझ्या संपूर्ण करिअरमध्ये एक कलाकार म्हणून प्रत्येक मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र माझे एक स्वप्न आहे जे माझ्या मनात नेहमीच होते. पण त्याला वास्तवात उतरवण्यासाठी काहीच केले नव्हते. माझे स्वप्न होते की फिटनेसला गांभीर्याने घेऊ.

अनुपम खेर फोटोत त्यांची फिट बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुपम खेर यांनी त्यांच्या बॉलिवूडमधील कारकीर्दीची सुरूवात महेश भट यांच्या सांराश चित्रपटातून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुपम खेर लवकरच द कश्मीर फाइल्समध्ये दिसणार आहे. जे ११ मार्चला भेटीला येणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)