IFFI सोहळ्यासाठी अंकिता लोखंडेचा मनमोहक लूक, स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 14:02 IST2024-11-22T13:50:09+5:302024-11-22T14:02:05+5:30

IFFI GOA: अंकिताचा कमाल फॅशन सेन्स, प्रत्येक लूकमध्ये दिसते सुंदर!

मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडेचे (Ankita Lokhande) अनेक चाहते आहेत. तिच्या सौंदर्याचं कौतुर करावं तितकं कमीच आहे. पारंपरिक असो किंवा वेस्टर्न लू, अंकिता कोणत्याही वेशात सुंदरच दिसते.

नुकतंच अंकिताने गोवा येथे आयोजित ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी हजेरी लावली. या खास सोहळ्यात अंकिताने केलेला लूकही मनमोहक आहे.

अंकिताचा फॅशन सेन्स कमाल आहे हे अनेकदा दिसून येतं. तिची प्रत्येक इव्हेंटसाठीची कपड्यांची निवड अप्रतिम असते. तसंच की असेच कपडे घालते ज्यात तिला कंफर्टेबल वाटतं.

गोव्यातील फिल्म फेस्टिव्हलसाठी अंकिताने असाच खास लूक केला. स्कीन कलरच्या अनारकली स्टाईल गाऊनमध्ये ती दिसली. त्यावर भरपूर वर्क असलेलं अटॅच जॅकेट दिसत आहे.

थोडं पारंपरिक आणि थोडं वेस्टर्न असा फ्यूजन असलेला तिचा लूक दिसत आहे. तसंच तिचे इअररिंग्सही लक्ष वेधून घेत आहेत. अंकिताने या लूकमध्ये छान पोज देत फोटोसेशन केलं आहे.

तसंच तिने पती विकी जैन आणि बेस्ट फ्रेंड सिद्धार्थसोबतही कँडिड फोटो शेअर केलेत. रेड कार्पेटवरील त्यांचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. विकीही यावेळी व्हाईट सूटमध्ये हँडसम दिसतो.

अंकिता या सोहळ्यात तिचा सिनेमा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' साठी आलेली होती. रणदीप हुड्डाही यावेळी उपस्थित होता.