100 नंतर आता 200! येतोय रिंकू राजगुरूचा नवा सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 15:43 IST2021-07-27T15:28:05+5:302021-07-27T15:43:30+5:30
Rinku Rajguru : अमोल पालेकर आणि बरुण सोबतीसह स्क्रीन शेअर करणार रिंकू राजगुरु

‘सैराट’ या सिनेमामुळे एका रात्रीत स्टार झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू आताश: फक्त मराठी अभिनेत्री राहिलेली नाही. होय, कारण आता बॉलिवूडमध्येही तिची एक खास ओळख निर्माण झाली आहे.
‘सैराट’ने तुफान यश मिळवले आणि रिंकू सर्वांच्या डोळ्यांत भरली. यानंतरचा रिंकूने मागे वळून पाहिलेच नाही.
गेल्यावर्षी ‘हंड्रेड’ या वेबसीरिजमध्ये रिंकू लारा दत्तासोबत झळकली. या वेबसीरिजमधील रिंकूच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले.
आता काय तर रिंकू ‘200’या सिनेमात झळकणार आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली. या चित्रपटात रिंकू दिग्गज अभिनेते अमोल पालेकर यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
अमोल पालेकर यांच्यासोबत बरुण सोबती याचीही यात मुख्य भूमिका आहे. युडली फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
या सिनेमात एका दलित महिलेची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तिच्यासोबत झालेल्या अन्यायाविरोधात ती कसा लढा देते, अशी या चित्रपटाची ढोबळ कथा आहे.
झी5 वर या चित्रपटाचा प्रिमियर होणार आहे. साहजिकच या सिनेमाची घोषणा होताच रिंकूच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
सैराट या सिनेमानंतर रिंकू 'कागर', 'मेकअप' या मराठी सिनेमांमध्ये झळकली होती.
रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती ‘छूमंतर’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
याशिवाय ती हिंदी चित्रपट ‘झुंड’मध्येदेखील दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे. तर या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.