अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाचं शिक्षण किती झालंय, तुम्हाला माहिती आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 19:38 IST2023-12-07T19:32:52+5:302023-12-07T19:38:34+5:30
अगस्त्य हा बिग बींची मुलगी श्वेता नंदा आणि निखिल नंदा यांचा मुलगा आहे.

झोया अख्तरचा 'द आर्चीज' हा चित्रपट आज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटातून अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
अगस्त्य नंदा हा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांचा मुलगा आहे.
निखिल नंदा हे एक मोठे उद्योगपती असून ते करोडोंचा व्यवसाय हाताळतात.
अगस्त्यने लंडनच्या सेव्हन ओक्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्याचबरोबर त्याने न्यूयॉर्कमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
रिपोर्टनुसार, सुहाना खान आणि अगस्त्य कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते.
अगस्त्य नंदाचे बहीण नव्यासोबत खास बॉन्डिंग आहे. नव्या अनेकदा अगस्त्यसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार अगस्त्य नंदा शाहरुख खानची मुलगी सुहाना खानला डेट करत आहे. मात्र, अशी कोणतीही माहिती दोन्ही बाजूंनी अधिकृतपणे शेअर केलेली नाही.