'अश्वत्थामा'च्या भूमिकेत असा झाला अमिताभ बच्चन यांचा कायापालट, पाहा हे खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 11:56 IST2024-07-03T11:37:11+5:302024-07-03T11:56:43+5:30
कल्कि २८९८ एडी सिनेमात अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली. या सिनेमासाठी अमिताभ यांच्या लूकवर किती मेहनत घेतली याचा अंदाज तुम्हाला फोटो पाहून येईल (amitabh bachchan, kalki 2898 ad)

अमिताभ बच्चन 'कल्कि २८९८ एडी' अश्वत्थामाची भूमिका साकारत आहेत

अमिताभ बच्चन यांनी 'कल्कि २८९८ एडी'मध्ये साकारलेली अश्वत्थामाची भूमिका चांगलीच गाजतेय

अश्वत्थामाच्या भूमिकेसाठी अमिताभ यांच्या लूकवर विशेष मेहनत घेण्यात आलीय

जीर्ण वस्त्र आणि वाढलेली दाढी अशा लूकमध्ये अमिताभ हुबेहूब अश्वत्थामा वाटतात

अमिताभ यांची धारदार नजर पाहून काळजात धडकी भरते. अमिताभ बच्चन यांचा अश्वत्थामाच्या लूकमध्ये झालेला कायापालट पाहून थक्क व्हायला होतं

कल्कि २८९८ एडी सिनेमा नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलाय. सिनेमाची सुरुवात महाभारत युद्धप्रसंगापासून होते. जिथे अश्वत्थामा अन् श्रीकृष्णाचा संवाद दिसतो

अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रभास, दीपिका पादुकोण, कमल हासन यांच्याही सिनेमात प्रमुख भूमिका आहेत
















