सलमान खान ते समंथा! फिटनेस फ्रिक असूनही 'हे' सुपरस्टार करतायेत गंभीर आजारांचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 13:06 IST2024-02-16T12:49:34+5:302024-02-16T13:06:00+5:30

Bollywood stars: कलाविश्वातील अनेक सुपरस्टार आज गंभीर आजारांचा सामना करत आहेत.

कलाविश्वातील सेलिब्रिटी कायम त्यांच्या लाइफस्टाइल आणि स्टारडममुळे चर्चेत येत असतात.

आजच्या घडीला प्रत्येक कलाकार त्यांच्या फिटनेसला प्रचंड महत्व देताना दिसतो. मात्र, यात असेही काही कलाकार आहेत. जे फिटनेस जपत असूनही त्यांना गंभीर स्वरुपाचे आजार आहेत. हे कलाकार कोणते ते पाहुयात.

वरुण धवन - अभिनेता वरुण धवन यालाही एक मोठा आजार आहे. वरुण व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन या आजाराने त्रस्त आहे. एका सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान त्याला त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याला हा आजार असल्याचं समोर आलं.

वरुणने एका मुलाखतीमध्ये त्याच्या या आजारपणाविषय़ी भाष्य केलं होतं. मात्र, या आजारात प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

सलमान खान- बॉलिवूडचा दबंग खान सलमान याच्या फिटनेसविषयी कोणालाही वेगळं सांगायची गरज नाही. सलमान स्वत:ला फिट ठेवण्यासाठी बराच काळ जीममध्ये घाम गाळतो. मात्र, तरीदेखील त्यालादेखील एक आजार आहे.

२०११ मध्ये सलमानला ट्रायजेमिनल न्यूराल्जिया नावाचा गंभीर आजार झाला. या आजारात चेहरा आणि शरीरातील नसा प्रचंड दुखतात.

अमिताभ बच्चन- बॉलिवूडवर राज्य करणारे बिग बी यांच्या संपत्तीविषयी आणि एकंदरीत त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. परंतु, ते एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत.

एका सिनेमाच्या शुटिंगदरम्यान बिग बींचा मोठा अपघात झाल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. या अपघातामध्ये त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. विशेष म्हणजे या अपघातानंतर त्यांना मायस्थेनिया ग्रॅव्हस नावाच्या आजाराने ग्रासलं आहे.

समंथा रुथ प्रभू- साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कायम सौंदर्यामुळे चर्चेत येणारी समंथा यावेळी तिच्या आजारपणामुळे चर्चेत येत आहे.

समंथा मायोसिटिस नावाच्या आजाराने त्रस्त आहे. या आजाराविषयी तिने स्वत: चाहत्यांना माहिती दिली.