अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 17:21 IST2025-12-12T17:07:27+5:302025-12-12T17:21:18+5:30

अक्षयचे वडिल विनोद खन्ना यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज आम्ही तुम्हाला अक्षयच्या दोन भावांबद्दल सांगणार आहोत. एक सख्खा आणि एक सावत्र.

बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या 'धुरंधर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटातील त्याची 'रेहमान डकैत' ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

अक्षय खन्ना हा पडद्यावर जितका प्रभावी आहे, तितकाच तो खासगी आयुष्यात सोशल मीडियापासून दूर आणि स्वतःमध्ये रमणारा आहे.

अक्षयचे वडिल विनोद खन्ना यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज आम्ही तुम्हाला अक्षयच्या दोन भावांबद्दल सांगणार आहोत. एक सख्खा आणि एक सावत्र. अक्षयच्या सख्खा भावाचं नाव राहुल तर सावत्र भावाचं नाव साक्षी असं आहे.

अक्षयचे वडिल विनोद खन्ना यांनी पहिलं लग्न गीतांजली यांच्याशी केलं होतं. या दोघांना अक्षय आणि राहुल ही दोन मुलं आहेत. अक्षयसारखाच राहुलसुद्धा अभिनेता आहे.

राहुलने १९९९ मध्ये दीपा मेहता यांच्या 'अर्थ' या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले, ज्यात आमिर खानही होता. या चित्रपटासाठी राहुलला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. पण, पुढे वडिल आणि भावाप्रमाणे त्याला यश मिळालं नाही.

आपल्या फिल्मी करिअरमध्ये राहुलने सुमारे ११ चित्रपटांत काम केले. पण सिनेमे चालेनात. मग राहुल खन्ना छोट्या पडद्याकडे वळला. ‘द अमेरिकन्स’ या टीव्ही शोमध्ये तो दिसला.

आज राहुल एक यशस्वी मॉडेल, लेखक आणि अनेक प्रमुख ब्रँड्सचा चेहरा म्हणून सक्रिय आहे. २०१९ मध्ये त्याने नेटफ्लिक्सच्या 'लैला' सीरिजमध्येही काम केले होते.

तर अक्षयचा दुसरा सावत्र भाऊ आहे साक्षी खन्ना. विनोद खन्ना यांनी गीतांजली यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर कविता दफ्तरी यांच्याशी लग्न केलं. साक्षी खन्ना आणि श्रद्धा खन्ना ही त्यांची मुले. म्हणजेच, साक्षी खन्ना हा अक्षयचा सावत्र भाऊ आहे.

साक्षी खन्नानेही वडील आणि मोठ्या भावांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले, परंतु त्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.

चित्रपटसृष्टीत म्हणावे तसे यश न मिळाल्याने, साक्षीने हळूहळू या ग्लॅमरच्या जगातून स्वतःला बाजूला केले.

आज, अक्षय खन्नाचा एक भाऊ चित्रपटसृष्टीत सक्रियपणे काम करत आहे, तर दुसरा भाऊ बॉलिवूड सोडून अध्यात्मिक जीवन जगत आहे.