'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये मोठा ट्विस्ट, नेहाच्या बदललेल्या लूकची होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 07:00 IST2022-10-22T07:00:00+5:302022-10-22T07:00:00+5:30
Mazi Tuzi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मध्ये पुन्हा एकदा उत्कंठावर्धक कथानक दाखवण्यात येत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' मध्ये पुन्हा एकदा उत्कंठावर्धक कथानक दाखवण्यात येत आहे. चौधरी कुटुंबावर कोसळलेल्या जीवघेण्या संकटातून संपूर्ण कुटुंबाचं फार मोठं नुकसान झालं आहे.
एवढ्या मोठ्या संकटातून यश आणि मिथिला तर बचावले आहेत मात्र नेहा बेपत्ता झाल्याने तिच्यासोबत नेमकं काय घडलं, नेहा कुठे गेली हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
दुसरीकडे पोलिसांना घटनास्थळी नेहाचं ब्रेसलेट मिळाल्याने त्यांनाही तिच्यासोबत नेमकं काय घडलं याचा अंदाज लावता येत नाहीये. दरम्यान आता झी मराठीने सोशल मीडियावर नेहाचा बदललेला लूक शेअर केला आहे.
नेहाचा बदललेला लूक पाहून मालिकेत पुढे काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
नेहमी साडीत दिसणारी नेहा कॉर्पोरेट लूकमध्ये दिसते आहे.
या फोटोत नेहाने लाल ब्लॅक टी शर्ट आणि लाल रंगाचं ब्लेझर परिधान केलेले दिसत आहे.
डोळ्याला गॉगल आणि मोकळ्या केसांनी तिचा लूक पूर्ण करण्यात आला आहे.
नेहाचा हा नवीन लूक चाहत्यांना भावतो आहे. मात्र यासोबतच मालिकेच्या कथानकाबाबत प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.