स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 11:28 IST2025-11-03T11:27:32+5:302025-11-03T11:28:33+5:30
Palash Muchhal Post for Smriti Mandhana: स्मृती मंधानासाठी डबल सेलिब्रेशन, ट्रॉफी जिंकली आणि आता...

स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
भारतीय महिला क्रिकेट संघाने काल इतिहास रचला. एक दिवसीय विश्वचषक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि चषक आपल्या नावावर केला. संपूर्ण देशाला आपल्या या मुलींचं खूप कौतुक आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कर्णधार हरमनप्रीतसह संघातील प्रत्येक मुलीने पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं आहे. दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघातील सांगलीची क्रिकेटपटू स्मृती मानधना लवकरच म्युझिक कंपोजर पलाश मुच्छलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करणारी पलाशची पोस्ट आता व्हायरल होत आहे.
भारतीय महिला संघाची उप-कर्णधार स्मृती मानधना विश्वचषक अंतिम सामन्यात ४५ धावा केल्या. तसंच तिने मादी कर्णधार मिताली राजचा विक्रम मोडला. महिला विश्वचषक स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता स्मृती मानधनाच्या नावे झाला आहे. स्मृती मंधानासाठी तर ही डबल सेलीब्रेशनची वेळ आहे. एकीकडे तिने संघासोबत मिळून वर्ल्डकप घरी आणला आहे तर दुसरीकडे ती लवकरच नवीन आयुष्यालाही सुरुवात करणार आहे. भारतीय संघाच्या या यशानंतर पलाशने स्मृतीचा ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर केला आहे. सोबतच त्याच्या हातावर SM18 हा टॅटूही दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, 'सबसे आगे है हम हिंदुस्तानी'.
पलाशच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत लिहिले, 'आम्ही याच पोस्टची वाट पाहत होतो','द टॅटू, द मॅन अँड द ट्रॉफी, स्मृतीला सगळं काही मिळालं आहे', 'तुझ्या होणाऱ्या बायकोने दिलेलं बेस्ट प्री वेडिंग गिफ्ट' अशा कमेंट्स आल्या आहेत.
कधी करणार लग्न?
स्मृती मंधाना आणि संगीतकार-पटकथाकार पलाश मुच्छल हे २० नोव्हेंबरला लग्न करणार असल्याची चर्चा आहे. सांगली येथे त्यांचा लग्नसोहळा संपन्न होणार आहे. सांगली हे स्मृती मंधानाचे मूळ गाव आहे. स्मृती आणि पलाश यांची ओळख २०१९ मध्ये झाली होती. दोघांनी आपल्या नात्याची अधिकृत कबुली गेल्या वर्षी सोशल मीडियावर दिली होती. पलाशने इंस्टाग्रामवर स्मृतीसोबत काही फोटो शेअर करत ‘५’ आणि हार्टचा इमोजीसह कॅप्शन दिले होते. ज्यावरून चाहत्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल समजले.