'ऑपरेशन सिंदूर'नंतर भडकला फवाद खान, 'पाकिस्तान जिंदाबाद'चा नारा लावला; पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:25 IST2025-05-07T13:24:39+5:302025-05-07T13:25:50+5:30

Fawad Khan on Operation Sindoor: फवाद खान, माहिरा खान अन् हानिया आमिरने 'ऑपरेशन सिंदूर'ला म्हटलं 'लज्जास्पद हल्ला', नेटकऱ्यांनी सुनावलं

Pakistani actor Fawad Khan s outrageous post after operation Sindoor says shameful attack | 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भडकला फवाद खान, 'पाकिस्तान जिंदाबाद'चा नारा लावला; पोस्ट व्हायरल

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भडकला फवाद खान, 'पाकिस्तान जिंदाबाद'चा नारा लावला; पोस्ट व्हायरल

काश्मिरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला पूर्ण झाला आहे. काल मध्यरात्री भारतीये हवाई दलाने हल्ला करत पीओकेतील ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. संपूर्ण देश आज या हल्ल्याचं आणि भारतीये सैन्याचं कौतुक करत आहे. त्या निष्पाप २६ पर्यटकांना मारण्यात आलं त्याचा आज बदला घेण्यात आला आहे. दरम्यान पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने (Fawad Khan)  'पाकिस्तान जिंदाबाद'चा नारा लावला आहे. यावरुन नेटकऱ्यांनी पाकिस्तानी कलाकारांना चांगलंच सुनावलं आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकवर अनेक निर्बंध आणले होते. सिंधू करार रद्द केला. तसंच पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट भारतात रद्द केले. अभिनेता फवाद खानचा 'अबीर गुलाल'हा हिंदी सिनेमा रिलीज होणार होता तो आता होऊ शकणार नाही. दरम्यान भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर फवाद खानची पोस्ट व्हायरल झाली आहे. तो लिहितो, "या भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. मृतांच्या आत्म्यास शांती मिळो आणि येणाऱ्या काळात त्यांच्या प्रियजनांना शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करतो."

तो पुढे लिहितो, "सर्वांना एक विनंती करतो की अशा काळात समाजात प्रक्षोभ उत्पन्न करणारे वक्तव्य करुन नका. निष्पाप लोकांचा जीव गेला आहे हे दु:ख शब्दात व्यक्त करता येणारे नाही. May Better sense prevail पाकिस्तान जिंदाबाद!"

फवाद खानशिवाय पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान, हानिया आमिर यांनीही भारताच्या हल्ल्याला 'भ्याड हल्ला' म्हटलं आहे. पाक कलाकारांच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. 

Web Title: Pakistani actor Fawad Khan s outrageous post after operation Sindoor says shameful attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.