सनी लिओनीच नव्हे तर या मोठ्या कलाकारांनीही केले होते अॅडल्ट सिनेमातून पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 15:49 IST2018-05-31T15:42:00+5:302018-05-31T15:49:32+5:30

सनीप्रमाणेच काही असे प्रसिद्ध कलाकार आहेत ज्यांनी लोकप्रियता मिळवण्याआधी अॅडल्ट सिनेमात काम केलं होतं. चला जाणून घेऊया अशात काही हॉलिवूड कलाकारांबाबत.....

Not Only Sunny Leone, Here Are 7 Mega Stars Who Started Their Career With Adult Films | सनी लिओनीच नव्हे तर या मोठ्या कलाकारांनीही केले होते अॅडल्ट सिनेमातून पदार्पण

सनी लिओनीच नव्हे तर या मोठ्या कलाकारांनीही केले होते अॅडल्ट सिनेमातून पदार्पण

तुम्ही सनी लिओनीला पसंत करत असाल किंवा करत नसाल तरीही ती आज बॉलिवूडची एक अभिनेत्री आहे याकडे तुम्ही दुर्लक्ष करु शकत नाही. सनीने जिस्म 2 या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि त्यानंतर काही सिनेमेही केले. सनीप्रमाणेच काही असे प्रसिद्ध कलाकार आहेत ज्यांनी लोकप्रियता मिळवण्याआधी अॅडल्ट सिनेमात काम केलं होतं. पण हे मोठे कलाकार बॉलिवूडमधील नाहीतर हॉलिवूडमधील आहेत. चला जाणून घेऊया अशात काही हॉलिवूड कलाकारांबाबत.....

1) सिल्व्हेस्टर स्टॅलोन

हॉलिवूडचा हा अॅक्शन स्टार तुम्हाला माहीत असेलच. रॉकी या सिनेमाच्या माध्यमातून मोठा ब्रेक मिळण्याआधी स्टॅलोन एक स्ट्रगलिंग कलाकार होता. त्यावेळी त्याने काही अॅडल्ट सिनेमात काम केले होते. तेव्हा त्या सिनेमाचं नाव ‘The Party at Kitty and Stud’s असं ठेवण्यात आलं होतं. पण नंतर स्टॅलोनला प्रसिद्ध मिळाली आणि पुढे हा सिनेमा ‘The Italian Stallone’ या नावाने रिलीज झाला.

2) मॅट ली ब्लॅंस

फ्रेन्ड या लोकप्रिय टीव्ही सीरिजमधून या अभिनेत्याला तुम्ही पाहिलं असेलच. त्याने ही सीरिज करण्याआधी सॉफ्ट पॉर्नमध्ये काम केलं होतं. 

3) अरनॉल्ड

हॉलिवूडच्या कितीतरी सिनेमांमध्ये अरनॉल्डने धमाकेदार अॅक्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. हॉलिवूडमध्ये येण्याआधी अरनॉल्ड अॅडल्ट इंडस्ट्रीचा भाग होता. त्याने अॅडल्ट सिनेमात काम जरी केले नसले तरी काही पॉर्न मॅगझिनसाठी त्याने फोटोशूट केले होते. 

4) साशा ग्रे

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री साशा ग्रे हिला तिच्या पास्टबाबत अजिबात काही वाटत नाही. हॉलिवूडमध्ये येण्याआधी ती एक लोकप्रिय पॉर्न स्टार होती. 

5) जॅकी चॅन

विश्वास नाही बसला ना? आपल्या मेहनतीच्या जोरावर इतका मोठा झालेल्या जॅकी चॅन याने सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना केला. त्यानेही काही अॅडल्ट सिनेमांमध्ये काम केले होते. 

6) सिबेल केकिल्ली

गेम ऑफ थ्रोन्स या लोकप्रिय टीव्ही सीरिजमधील भूमिकेसाठी सिबेलला काही मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. पण या सीरिजचा भाग होण्य़ाआधी ती पॉर्न इंडस्ट्रीचा भाग होती. 

7) कॅमेरॉन डियाझ

कॅमेरॉन ही हॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. कितीतरी सुपरहिट सिनेमे तिने दिलेत. पण 19 वर्षांची असतानाच तिने पॉर्न स्टार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. 
 

Web Title: Not Only Sunny Leone, Here Are 7 Mega Stars Who Started Their Career With Adult Films