काय सांगता! 'रांझणा'साठी धनुष नाही तर हा अभिनेता होता पहिली पसंती, तुम्हाला माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 13:32 IST2024-08-27T13:30:53+5:302024-08-27T13:32:07+5:30

'रांझणा' या गाजलेल्या सिनेमासाठी धनुष नव्हे तर या लोकप्रिय अभिनेत्याला झालेली विचारणा

not dhanush but ranbir kapoor is the first choice of ranjhana movie | काय सांगता! 'रांझणा'साठी धनुष नाही तर हा अभिनेता होता पहिली पसंती, तुम्हाला माहितीये?

काय सांगता! 'रांझणा'साठी धनुष नाही तर हा अभिनेता होता पहिली पसंती, तुम्हाला माहितीये?

"अब कौन साला फिरसे उठे, दिल लगवाने को, दिल तुडवाने को", अशा डायलॉगने फेमस झालेला 'रांझणा' सिनेमा एक आयकॉनिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. या  सिनेमातील गाणी, कथा, कलाकारांचा अभिनय अशा अनेक गोष्टींची चांगली चर्चा झाली. धनुष-सोनम कपूर-अभय देओल या जोडीने त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने 'रांझणा' गाजवला. पण तुम्हाला माहितीये का हा कलाकार कोण होता? जाणून घ्या.

धनुष नव्हे तर हा कलाकार होता 'रांझणा'ची पहिली पसंती

आनंद एल राय दिग्दर्शित 'रांझणा' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमात धनुषने साकारलेल्या कुंदन या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं. 'रांझणा'च्या कुंदनसाठी धनुष नव्हे तर अभिनेता रणबीर कपूर पहिली पसंती होता. परंतु त्यावेळी रणबीरकडे उपलब्ध तारखा नव्हत्या. त्यामुळे सिनेमाच्या टीमने प्रमुख भूमिकेसाठी  दुसऱ्या अभिनेत्याची शोधाशोध केली तेव्हा धनुषची निवड करण्यात आली. धनुषचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा होता. धनुषने साकारलेली कुंदनची भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली.

'रांझणा' सिनेमाविषयी आणखी काही

२०१३ साली 'रांझणा' सिनेमा रिलीज झाला. ए.आर.रेहमान यांनी सिनेमाला संगीत दिलं होतं. 'तनु वेड्स मनू'नंतर आनंद एल राय यांच्या या सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. सिनेमा रिलीज झाला आणि अनपेक्षितपणे सिनेमाने जबरदस्त यश मिळवलं. प्रेक्षकांची पसंती + बॉक्स ऑफिसवर कमाई अशा दुहेरी कामगिरीत सिनेमा न्हाऊन निघाला. आजही या सिनेमातली गाणी, अभिनय, डायलॉग चाहत्यांच्या तोंडपाठ आहेत.

Web Title: not dhanush but ranbir kapoor is the first choice of ranjhana movie