जुन्या अंदाजात पुन्हा परतली Nora Fatehi, स्कीन टाइट ड्रेसमध्ये दाखवला आपला बोल्ड अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 15:00 IST2021-11-09T14:59:46+5:302021-11-09T15:00:27+5:30
Nora Fatehi :नुकताच समोर आलेल्या एका व्हिडीओत तिचा जुना कॉन्फिडन्स पुन्हा एकदा बघायला मिळाला. ज्या अंदाजात नोरा वॉक करत आहेत ते बघून तिचे फॅन्स घायाळ झाले आहे.

जुन्या अंदाजात पुन्हा परतली Nora Fatehi, स्कीन टाइट ड्रेसमध्ये दाखवला आपला बोल्ड अंदाज
बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) गेल्या काही दिवसांपासून जरा शांत शांत दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वी तिच्या नावाने ईडीने समन जारी केला होता. अशात तिच्या चेहऱ्यावरील रौनकच गायब झाली आहे. मात्र, नुकताच समोर आलेल्या एका व्हिडीओत तिचा जुना कॉन्फिडन्स पुन्हा एकदा बघायला मिळाला. ज्या अंदाजात नोरा वॉक करत आहेत ते बघून तिचे फॅन्स घायाळ झाले आहे.
नोरा फतेहीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नोराचा एटीट्यूड कमाल आहे. यात ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. ज्यात ती फारच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे. नोराने या ड्रेसच्या माध्यमातून आपली कमाल फिगर फ्लॉंट केली आहे.
याआधीही नोराचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तिचे फॅन्स तिची एक झलक बघण्यासाठी आतुर असतात आणि तिचा कोणताही व्हिडीओ लगेच व्हायरल करतात. नोरा ही डान्सर असली तरी बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीं इतकीच लोकप्रिय आणि ग्लॅमरस आहे.
नोराच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर तिच्या करिअरची सुरूवात बिग बॉसपासून झाली होती. ज्यानंतर ती काही गाण्यांमध्ये दिसली. खासकरून 'दिलबर' आणि 'गर्मी' गाण्यांमुळे नोराला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली. नोरा नुकतीच छोड देंगे या गाण्यात दिसली होती. तिचं नाच मेरी राणी हेही गाणं हिट झालं होतं.