'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटवर काय करतात कलाकार? निखिल बनेने शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 11:08 AM2024-04-18T11:08:03+5:302024-04-18T11:08:35+5:30

"चला जाऊ शूटिंगला", निखिल बनेने दाखली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटची झलक

nikhil bane shared video of maharashtrachi hasyajatra set | 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटवर काय करतात कलाकार? निखिल बनेने शेअर केला व्हिडिओ

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटवर काय करतात कलाकार? निखिल बनेने शेअर केला व्हिडिओ

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो आहे. घराघरात या शोचे चाहते आहेत. हास्यजत्रेतील कलाकार विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना लोटपोट करतात. छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांना हसवणारे हास्यजत्रेचे कलाकार पडद्यामागे काय करतात, हे तुम्हाला माहीत आहे का? या शोचं शूटिंग कुठे होतं? कलाकार रिहर्सल कुठे करतात? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? हास्यजत्रा फेम निखिल बनेच्या व्हिडिओत या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील.

हास्यजत्रेमुळे अनेक नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळाली. निखिल बनेही अशाच नवोदित कलाकारांपैकी एक आहे. बनेने प्रेक्षकांच्या मनात त्याचं स्थान निर्माण केलं आहे. तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही तो चाहत्यांना देत असतो. आतादेखील त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने त्याचं रुटिन सांगितलं आहे. दिवसभरात बनेने काय काय केलं? हे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 

निखिल बनेने त्याच्या या व्हिडिओत हास्यजत्रेच्या सेटची झलकही दाखवली आहे. सकाळी घरातून नाष्टा करून बने हास्यजत्रेच्या शूटिंगला गेल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर व्हिडिओत हास्यजत्रेचे कलाकार रिहर्सल करत असल्याचं दिसत आहे. एका छोट्या खोलीत प्रसाद खांडेकर, निखिल बने, श्रमेश बेटकर, पृथ्विक प्रताप स्किटचं रिहर्सल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. "चला जाऊ शूटिंगला", असं म्हणत बनेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

या व्हिडिओवर हास्यजत्रेच्या कलाकारांबरोबरच काही चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. बनेचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. हास्यजत्रेबरोबरच बनेने सिनेमातही काम केलं आहे. 'बॉईज ४' या सिनेमात तो दिसला होता. 
 

Web Title: nikhil bane shared video of maharashtrachi hasyajatra set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.