अमोल मुजुमदारची कहाणी वाचून नेटकऱ्यांना आठवला शाहरुखचा 'चक दे इंडिया', केली 'ही' मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:10 IST2025-11-03T16:05:55+5:302025-11-03T16:10:31+5:30
काल भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकण्यात अमोल मुजुमदार यांचं महत्वपूर्ण योगदान होतं. नेटकऱ्यांनी अमोल यांचं कनेक्शन 'चक दे इंडिया'शी लावलंय. जाणून घ्या

अमोल मुजुमदारची कहाणी वाचून नेटकऱ्यांना आठवला शाहरुखचा 'चक दे इंडिया', केली 'ही' मागणी
भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप २०२५ वर स्वतःचं नाव कोरलं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरलं. भारतीय संघाने जो विश्वचषक झाला त्यासाठी पडद्यामागे भारतीय महिला क्रिकेट संघाचे कोच अमोल मुजुमदार यांचेही कष्ट होते. त्यामुळे भारताने विश्वचषकावर नाव कोरल्यावर अमोल मुजुमदार यांची कहाणी बघून लोकांना शाहरुखच्या 'चक दे इंडिया' सिनेमाची आठवण आली आहे. याशिवाय त्यांनी खास मागणी केलीय. जाणून घ्या सविस्तर
नेटकऱ्यांनी केली खास मागणी, म्हणाले-
भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांची पार्श्वभूमी वाचून लोकांना शाहरुख खानच्या कबीर खान या पात्राची आठवण आली. 'चक दे इंडिया' सिनेमात कबीर खान हा भारतीय महिला हॉकी संघाचा प्रशिक्षक असतो. कोच कबीर खानचं भारतीय महिला हॉकी संघाला वर्ल्डकप जिंकवून देण्यामागे मोलाचं योगदान असतं. त्यामुळे अमोल मुजुमदार यांच्यासाठी 'चक दे इंडिया २' सिनेमा बनवावा अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. एक नेटकरी लिहितो, 'चक दे इंडिया २ चा सीक्वल बनवण्यासाठी परफेक्ट स्क्रीप्ट आहे.'
आणखी एका युजरने लिहिलं की, 'भारतीय संघात खेळण्यासाठी अमोल मुजुमदार यांना कधीच स्थान मिळालं नाही. परंतु भारतीय महिला क्रिकेट संघाला वर्ल्डकप जिंकवून देण्यात मुजुमदार यांचा मोलाचा वाटा आहे. सचिन तेंडुलकरसोबत एकेकाळी मुजुमदार यांची तुलना व्हायची. पण त्यांना भारतासाठी खेळण्याची कधीच संधी दिली नाही.'
अशाप्रकारे नेटकऱ्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे कोच अमोल मुजुमदार यांच्या आयुष्यावर आधारीत 'चक दे इंडिया २' बनवावा, अशी मागणी केलीये. भारतीय महिलांनी वर्ल्डकप जिंकल्यावर संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौरने अमोल मुजुमदार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. याशिवाय जगभरातील भारतीय क्रिकेटप्रेमी अमोल यांचं अभिनंदन करत आहेत.