Sonam Kapoor: "पापा की परी हो...", मुंबईच्या ट्रॅफिकमुळे त्रस्त झालेल्या सोनम कपूरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 16:53 IST2023-01-14T16:52:26+5:302023-01-14T16:53:13+5:30
sonam kapoor on mumbai traffic: मुंबईच्या ट्रॅफिकमुळे त्रस्त झालेल्या सोनम कपूरला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

Sonam Kapoor: "पापा की परी हो...", मुंबईच्या ट्रॅफिकमुळे त्रस्त झालेल्या सोनम कपूरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Sonam Kapoor gets trolled । मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर मुलगा वायुच्या जन्मापासून सोशल मीडियापासून दूर आहे. मात्र, अभिनेत्रीने शनिवारी ट्विटरवर मुंबईच्या ट्रॅफिक आणि प्रदूषणाबाबत एक ट्विट केले आहे, ज्यामुळे ती ट्रोल होत आहे. सोनम कपूरने ट्विटच्या माध्यमातून मुंबईतील विकास कामांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तिने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "मुंबईतून गाडी चालवणे त्रासदायक आहे. जुहूहून बँडस्टँडला पोहोचायला मला एक तास लागला आहे. सर्वत्र खोदकाम होत आहे आणि सर्वत्र बांधकाम सुरू आहे. प्रदूषण त्रास देत आहे. काय होत आहे." सोनम कपूरचे हे ट्विट पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. तुमच्या आरामासाठी विकासकामे थांबवायची का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.
It’s torturous to drive through mumbai. It’s taken me an hour to reach bandstand from Juhu. Too much construction and digging everywhere. Pollution is through the roof. What’s going on.
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) January 14, 2023
सोनम कपूर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
सोनमच्या ट्विटवर एका युजरने लिहिले, "याला विकास म्हणतात, जो वर्षांपूर्वी व्हायला हवा होता. बरं आता उशीराने का होईना होत आहे. तरीही तुम्ही तुमच्या एसी कारमध्ये प्रवास करत असाल आणि तुम्हाला त्रास होत आहे. दररोज प्रवास करणाऱ्या लोकांबाबत थोडी कल्पना करा." त्याचवेळी आणखी एका युजरने गंमतीत लिहिले, "पापा की परी हो, उड़ के चली जाओ". तर अनेक नेटिझन्स म्हणतात की, "आम्हाला फक्त प्रत्येक गोष्टीची तक्रार करण्याची सवय आहे. सरकार काम करत असले तरी आणि नसले तरी."
Papa ki pari ho उड़ के चली जाओ।।। https://t.co/1OtZIMO7Y7
— MISHRA Sushil (@sushil438) January 14, 2023
Haan toh construction vaghere sab band kar de taki madam ko aaram mile.. https://t.co/1H8bop6ymNpic.twitter.com/Aai0EUUi3C
— Perfectly Average (@manishtamancha) January 14, 2023
दरम्यान, सोनम कपूरच्या चित्रपटांबद्दल भाष्य करायचे झाले तर, मागील तीन वर्षांपासून सोनम रुपेरी पडद्यावर दिसलेली नाही. पण तिचा चित्रपट ब्लाइंड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे आणि तो 2023 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शोम मखिजा आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"