‘गणेश गायतोंडे’ ओटीटीला कंटाळला...! नवाजुद्दीन सिद्दीकी यापुढे करणार नाही वेबसीरिजमध्ये काम...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 15:59 IST2021-10-29T15:58:14+5:302021-10-29T15:59:47+5:30

Nawazuddin Siddiqui:  नवाजुद्दीन सिद्दीकीनं का घेतला असा निर्णय, काय आहे कारण? 

nawazuddin siddiqui will not be a part of any ott shows | ‘गणेश गायतोंडे’ ओटीटीला कंटाळला...! नवाजुद्दीन सिद्दीकी यापुढे करणार नाही वेबसीरिजमध्ये काम...!!

‘गणेश गायतोंडे’ ओटीटीला कंटाळला...! नवाजुद्दीन सिद्दीकी यापुढे करणार नाही वेबसीरिजमध्ये काम...!!

नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता. बॉलिवूडचं नव्हे तर ओटीटीवरही (OTT) नवाजुद्दीननं नाव कमावलं. ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमध्ये त्यानं साकारलेली  गणेश गायतोंडेची भूमिका म्हणजे निव्वळ अफलातून. अशात नवाजला ओटीटीवर पाहायला कोणाला आवडणार नाही? पण कदाचित यापुढे हे शक्य नाही. होय, भविष्यात ओटीटी शो  न करण्याचा निर्णय नवाजुद्दीनने घेतला आहे आणि त्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे.
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनने डीजिटल प्लॅटफॉर्मवरच्या कन्टेन्टवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

फालतू व  निकृष्ट...
डिजिटल प्लॅटफॉर्मआता केवळ फालतू आणि निकृष्ट दर्जाचा कन्टेन्ट देऊ लागले आहेत.  जणू ओटीटी प्लॅटफॉर्म डंपिंग ग्राऊंड बनली आहेत. कोणतेच चांगले शो नाही. जुन्याच शोचे सीक्वल बनून ते सादर केले जात आहेत. यात नवं बघण्यासारखं काहीही नाही, असं तो म्हणाला.

सेक्रेड गेम्स केली तेव्हा मी...
नेटफ्लिक्ससाठी मी सेक्रेड गेम्स ही वेबसीरिज केली तेव्हा मी खूप उत्साहित होतो आणि डिजिटल मीडियम एक आव्हान म्हणून मी स्वीकारलं होतं. इथे नव्या टॅलेंटला संधी मिळतं होती. पण आता तो फ्रेशनेस गायब झाला आहे. मोठमोठे प्रॉडक्शन हाऊस व ओटीटीचे सुपरस्टार म्हटले जाणारे काही सो-कॉल्ड कलाकारांसाठी आता हा धंदा बनला आहे. मोठ्या प्रोड्यूसर्सला अधिकाधिक कन्टेन्ट बनवण्यासाठी भरभक्कम पैसे मिळत आहे आणि यामुळे क्वालिटी संपली आहे. आता ओटीटी शो झेलणं कठीण झालं आहे. त्यामुळे मी आता अशा बेकार शोचा भाग बनू इच्छित नाही, असंही तो म्हणाला.
 

Web Title: nawazuddin siddiqui will not be a part of any ott shows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.