'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:18 IST2025-12-24T17:16:24+5:302025-12-24T17:18:21+5:30
'धुरंधर'च्या पुढच्या पार्टमध्ये काय असणार?

'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबोला आहे. सिनेमात एकापेक्षा एक 'धुरंधर' कलाकार आहेत. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, आर माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट आहे. 'धुरंधर'चं हे तुफानी यश पाहता रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना शांत का? यावरुन अखेर पडदा उठला आहे. सिनेमात डोंगा या भूमिकेत दिसलेले अभिनेता नवीन कौशिकने याचा खुलासा केला आहे.
लाईव्ह हिंदुस्तानला दिलेल्या मुलाखतीत नवीन कौशिक म्हणाला, "माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही. मला नाही वाटत त्यांनी अजून यशावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मला वाटतं ते सध्या वाट पाहत आहेत. त्यांच्यावर अजून पार्ट २ चंही ओझं आहे. ते असतं ना एकदा पूर्ण काम होऊ द्या मग त्यावर सविस्तर बोलू असं त्यांच्या मनात असेल. तसंच पार्ट २ मध्ये तर दुप्पट मजा येणार आहे. खरं सांगायचं तर माझी जितकी भूमिका होती तिथपर्यंतच आदित्य सरांनी मला स्क्रिप्ट दिली होती. हा सिनेमा विशिष्ट पद्धतीने लिहिण्यात आला आहे आणि यात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. चुकूनही काहीही बाहेर आलं तर सगळी मजा जाईल. अनेकांच्या मनात पुढच्या पार्टबद्दल प्रश्न आहेत, पुढे काय होणार, कोण व्हिलन असणार असे प्रश्न आहेत. मी स्वत:ही पुढचा पार्ट पाहण्यासाठी उत्सुक आहे."
'धुरंधर'ने जगभरात ८०० कोटी पार कमाई केली आहे. तर भारतात सिनेमाने ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. हा सिनेमा येणाऱ्या इतर सर्व सिनेमांचा पछाडत आहे. आता सर्वांनाच पुढच्या भागाची उत्सुकता आहे. पहिल्या भागात रहमान डकैतचा मृत्यू झाल्याने आता अक्षय खन्ना पार्ट २ मध्ये दिसणार आहे. रणवीर, अर्जुन रामपाल यांच्या भूमिकांंचं पुढे काय होतं याकडे सर्वांचं लक्ष आहे.