राजामौलींच्या सिनेमातून नानांची एक्झिट! कोटींची ऑफर नाकारली, पण कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:32 IST2025-05-28T15:31:04+5:302025-05-28T15:32:07+5:30
SSMB29मध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होते. पण, आता मात्र नानांनी राजामौलींच्या सिनेमातून एक्झिट घेतली आहे.

राजामौलींच्या सिनेमातून नानांची एक्झिट! कोटींची ऑफर नाकारली, पण कारण काय?
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली त्यांच्या आगामी SSMB29 सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमात महेश बाबू मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. तर बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे. SSMB29मध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होते. पण, आता मात्र नानांनी राजामौलींच्या सिनेमातून एक्झिट घेतली आहे.
राजामौलींनी SSMB29 सिनेमाची नानांना ऑफर दिली होती. २०२४मध्ये राजामौली स्वत: सिनेमाची ऑफर घेऊन नाना पाटेकर यांना भेटायला पुण्याला गेले होते. त्यांनी नानांना सिनेमाची स्क्रिप्टही सांगितली होती. त्यानंतर नानांनी लूक टेस्टही दिली होती. नानांना या सिनेमासाठी २० कोटींचं मानधन ऑफर करण्यात आलं होतं. त्यांचं १५ दिवसांचं शूटिंग शेड्युल लागणार होतं. मात्र, आता न्यूज १८च्या रिपोर्टनुसार, नाना पाटेकरांनी राजामौलींच्या सिनेमाची ऑफर नाकारली आहे. मॅशेबल इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, राजामौलींनी ऑफर केलेल्या भूमिकेत वेगळं काही करण्यासारखं नसल्याने नानांनी सिनेमातून एक्झिट घेतली आहे. भविष्यात, नानांनी राजामौलींसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
राजामौलींच्या SSMB29 सिनेमाचं शूटिंग जानेवारी महिन्यात सुरू झालं आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी प्रियांका चोप्रा भारतात आली होती. प्रियांकाने महेश बाबूसोबत हैदराबादमध्ये सिनेमातील काही सीन्सचं शूटिंग केलं होतं. प्रियांका आणि महेश बाबूसोबत या सिनेमात पृथ्वीराज सुकुमारनदेखील आहेत.