इम्रान हाश्मीच्या पुस्तकाचे नाव जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 03:53 IST2016-02-19T16:51:22+5:302016-02-20T03:53:03+5:30
बॉलिवूड सिरियल किसर इम्रान हाश्मीचे एक वेगळेच रुप आपणा सर्वांसमोर येणार आहे. त्याच्या मुलाच्या कॅन्सर ट्रीटमेंट दरम्यान आलेल्या अनुभवांवर ...

इम्रान हाश्मीच्या पुस्तकाचे नाव जाहीर
ब लिवूड सिरियल किसर इम्रान हाश्मीचे एक वेगळेच रुप आपणा सर्वांसमोर येणार आहे. त्याच्या मुलाच्या कॅन्सर ट्रीटमेंट दरम्यान आलेल्या अनुभवांवर आधारित त्याने पुस्तक लिहिले आहे. नुकतेच ट्विट करून त्याने पुस्तकाचे नाव जाहीर केले.
‘द किस आॅफ लाईफ : हाऊ ए सुपरहीरो अँड माय सन डिफिटेड कॅन्सर’ असे या पुस्तकाचे नाव असून लवकर प्रकाशित होणार आहे.
त्याने ट्विट केले की, माझ्या मुलाने कॅन्सरशी दिलेल्या लढ्याबद्दल लिहिलेल्या पुस्तकाचे नाव जाहीर करताना मला अतिशय आनंद होतोय. झैदी हुसैैन, बिलाल सिद्दीकी, ऐश्वर्या मिली आणि प्रकाशक पेंग्विन इंडियाचे मी मनापासून आभार मानतो.
इंग्लिश, हिंदी आणि मराठी अशा तीन भाषांतून पुस्तक प्रदर्शित होणार आहे. गेली दोन वर्षे त्याचा मुलगा अयान कॅन्सरशी लढा देत आहे. तो म्हणतो, हा काळ माझ्या कुटुंबियांसाठी फार कठिण होता. कॅन्सर आणि माझ्या मुलाने मला आयुष्यभर कामी येतील असे धडे शिकवले आहेत.
सध्या इम्रान हाश्मी मोहम्मद अझरुद्दीनच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘अझहर’च्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर तो ‘राज 4’ची शुटिंग सुरू करणार.

Thank you @husainzaidi @bilalms158@gmail.com, @mileeashwarya, @PenguinIndia for supporting me through this entire journey.— emraan hashmi (@emraanhashmi) February 19, 2016
इंग्लिश, हिंदी आणि मराठी अशा तीन भाषांतून पुस्तक प्रदर्शित होणार आहे. गेली दोन वर्षे त्याचा मुलगा अयान कॅन्सरशी लढा देत आहे. तो म्हणतो, हा काळ माझ्या कुटुंबियांसाठी फार कठिण होता. कॅन्सर आणि माझ्या मुलाने मला आयुष्यभर कामी येतील असे धडे शिकवले आहेत.
सध्या इम्रान हाश्मी मोहम्मद अझरुद्दीनच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘अझहर’च्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर तो ‘राज 4’ची शुटिंग सुरू करणार.
So happy to announce the title of my book... The Kiss of Life : How A Superhero and My Son Defeated Cancer pic.twitter.com/LEiMseHkS7— emraan hashmi (@emraanhashmi) February 19, 2016