'दोन वृद्ध पुरुषांनी कमरेवर हात ठेवला, अश्लील चाळे...', मौनी रॉयसोबत घडला किळसवाणा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 09:17 IST2026-01-25T09:16:50+5:302026-01-25T09:17:33+5:30

मी त्यांना समजावलं तर उलट त्यांनी..., मौनी रॉयने सांगितली संपूर्ण घटना

mouni roy faced harassment on stage at haryana event where two aged men touched on her waist actress post on social media | 'दोन वृद्ध पुरुषांनी कमरेवर हात ठेवला, अश्लील चाळे...', मौनी रॉयसोबत घडला किळसवाणा प्रकार

'दोन वृद्ध पुरुषांनी कमरेवर हात ठेवला, अश्लील चाळे...', मौनी रॉयसोबत घडला किळसवाणा प्रकार

अभिनेत्री मौनी रॉय टीव्ही ते बॉलिवूड सिनेमांमध्येही लोकप्रिय चेहरा आहे. हिंदी मालिका ते हिंदी सिनेमे असा तिचा प्रवास राहिला आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या मौनी वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. नुकतंच हरियाणामध्ये ती एका इव्हेंटसाठी पोहोचली असता तिथे तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात आलं. एका वयस्कर माणसाने तिच्याकडे बघून अश्लील हावभाव केल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.

मौनी रॉयने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहिली. ती म्हणते, 'काल करनालमध्ये एक इव्हेंट होता. तेथे आलेल्या प्रेक्षकांच्या वर्तनामुळे मी खूप नाराज आहे. विशेषत: दोन अंकल जे आजोबांच्या वयाचे असतील. इव्हेंट सुरु झाला आणि मी स्टेजवर जात होते तेव्हा त्या अंकल आणि कुटुंबातील इतर पुरुषांनी फोटो क्लिक करण्यासाठी माझ्या कमरेवर हात ठेवला. यावर मी लगेच आक्षेप घेतला आणि म्हणाले, 'सर प्लीज हात काढा' तर हे त्यांना आवडलं नाही."

"स्टेजवर गेल्यानंतर तर अजूनच जास्त किळसवाणा प्रकार घडला. ते दोन्ही काका माझ्या समोर उभे राहून अश्लील हावभाव करायला लागले. अश्लील कमेंट करत होते आणि माझं नाव घेऊन मला चिडवत होते. मला हे समजल्यावर आधी मी त्यांच्याकडे बघून प्रेमाने त्यांना असं करु नका सांगितलं. तर त्यानंतर त्यांनी माझ्यावर गुलाब फेकले. मी माझ्या परफॉर्मन्सच्या मध्येच एक्झिटकडे गेले पण परत येऊन परफॉर्मन्स पूर्ण केला. पण ते तेवढ्यावर थांबले नाहीत आणि कोणीही त्यांना तिथून हटवलं नाही. जर हे माझ्यासोबत घडलं तर कोणत्याही मुलीसोबत घडत असेल. आणखी एक गोष्ट म्हणजे स्टेज उंचीवर होता आणि हे दोन अंकल खालच्या अँगलने व्हिडीओ घेत होते. कोणीतरी त्यांना थांबवलं तर त्यांनी त्यालाही शिव्या दिल्या. माझं आपल्या देशावर प्रेम आहे, इथल्या माणसांवर आहे पण अशी माणसं? हे असे पुरुष? या प्रसंगावर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. आम्ही कलाकार अशा इव्हेंट्समध्ये जातो नवरा नवरीला शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासोबत सेलिब्रेट करतो. पण तिथे अशा प्रकारे लोक आम्हाला त्रास देतात हे दुर्दैवी आहे."

Web Title : मौनी रॉय एक कार्यक्रम में हुईं उत्पीड़न का शिकार, अश्लील इशारों का आरोप।

Web Summary : मौनी रॉय को हरियाणा में एक कार्यक्रम में उत्पीड़न का सामना करना पड़ा। उन्होंने आरोप लगाया कि दो बुजुर्ग पुरुषों ने आपत्ति जताने के बाद भी उनकी ओर अश्लील इशारे और टिप्पणी की। उन्होंने निराशा व्यक्त की।

Web Title : Mouni Roy harassed at event, alleges obscene gestures by elders.

Web Summary : Mouni Roy faced harassment at a Haryana event. She alleges two elderly men made obscene gestures and comments towards her, even after she objected. She expressed disappointment and concern for other women.