आव्हान पेलण्यासाठीच निर्मिती क्षेत्रात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:17 AM2016-01-16T01:17:14+5:302016-02-09T08:01:08+5:30

आज आपण मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत, असं कितीही म्हणत असलो, तरी किती चित्रपट खरोखरच प्रेक्षकांपर्यंत पोहचतात हा प्रश्न ...

To meet the challenge, only in the field of production | आव्हान पेलण्यासाठीच निर्मिती क्षेत्रात

आव्हान पेलण्यासाठीच निर्मिती क्षेत्रात

googlenewsNext
आपण मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत, असं कितीही म्हणत असलो, तरी किती चित्रपट खरोखरच प्रेक्षकांपर्यंत पोहचतात हा प्रश्न आहे. त्यात अजून एक गोष्ट म्हणजे आजही मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटांना प्राधान्य देत नाहीत. त्यातही एकाच पठडीतील चित्रपट लोकांना पाहायला आवडतात. त्यामुळे मराठी चित्रपट हीच प्रेक्षकांची प्रायॉरिटी असणे गरजेचे आहे; कारण तर आणि तरच प्रेक्षकसंख्या वाढेल. निर्णयक्षमता सगळ्यात मोठं आव्हान
बाहेरून निर्मिती क्षेत्र हे केवळ पैसा कमवून देणारं असं वाटतं असलं तरी यामध्ये प्रचंड आव्हानं आहेत. कारण आपण निर्माते असताना निर्मिती आणि फायनान्सच्या बाबतीत एकूणएक निर्णय निर्मात्यालाच घ्यावा लागतो आणि बाकी सगळे फक्त निर्मात्याकडे बघत असतात. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मितीत प्रचंड पैसा ओतलेला असल्याने जे होईल त्याला फक्त आणि फक्त निर्माताच जबाबदार असतो. आपण गुंतवलेले पैसे योग्य ठिकाणी खर्च होतायत ना आणि योग्य तेवढेच खर्च होतायत ना, या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला लागतं. प्रेक्षकांची विश्‍वासार्हता वाढवणे एकमेव पर्याय
प्रेक्षकसंख्या वाढत नाही यामागे अनेक कारणे आहेत. त्याला केवळ चित्रपटाला जबाबदार धरून चालत नाही. जसं हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, ती आपल्याला जवळची भाषा आहे. पण दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी भाषा त्यांच्यासाठी नसल्यासारखीच आहे. त्यामुळे ते फक्त त्यांच्याच भाषांतील चित्रपट पाहतात. त्यामुळे आपल्याकडे हिंदी चित्रपटांना प्राधान्य दिले जाते. त्यासाठी निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी सतत चांगले चित्रपट प्रेक्षकांना पाहायला देणं आणि त्यांची विश्‍वासार्हता वाढवणं, हा एकच पर्याय आहे. अनेक वर्षे आणि त्यातही वेगवेगळ्या प्रकारच्या भाषांतील चित्रपटांत अभिनय केल्यावर प्रत्येक कलाकाराला वेगळं काहीतरी करावंसं वाटतं असतं. कोणाला दिग्दर्शन करावसं वाटतं तर कोणाला स्वत: चित्रपट निर्मिती करावी असं स्वप्न असतं. अभिनेता अतुल कुलकर्णीदेखील त्याला अपवाद नाहीत. सोलापूरमधल्या बिझनेस कुटुंबातील असूनही अतुल कुलकर्णींनी प्रथम अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. प्रथम नाट्य आराधना या सोलापूरमधीलच ग्रुपमधून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली आणि त्यानंतर कन्नडमधील भूमी गीता, मराठीतील कैरी, तेलुगूमधील जयम मनडे रा, अन्ध्रावाला, गोवरी, तमीळमधील हे राम, रन, मल्याळममधील अँट अंधेरी, नेलिक्का, कनाल, इंग्लिशमधील मँगो सूफी, द लव्हर्स, हिंदीतील चांदनी बार, ८८ अँटॉप हिल, सत्ता, दम, पेज ३, तर मराठीतील वास्तुपुरुष, चकवा, मातीमाय, नटरंग, हॅप्पी जर्नी असे केवळ मराठी भाषेपुरतेच र्मयादित न राहता विविध भाषांतील चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. मात्र तरीही काहीतरी वेगळं करायची इच्छा अतुल यांच्या मनात होती.. आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी 'राजवाडे अँड सन्स' या चित्रपटासाठी स्वत:च्या 'कॅफे कॅमेरा' या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं.
या निर्मितीच्या क्षेत्रातील पदार्पणाविषयी अतुल कुलकर्णी 'सीएनएक्स'शी बोलताना सांगतात, ''सुरुवातीपासून चित्रपट निर्मितीमध्ये माझा नेहमीच रस होता. माझ्या घरात वडिलांपासून प्रत्येक नातेवाईक बिझनेसमन आहे. त्यामुळे आपणही कधीतरी बिझनेस करावा, अशी इच्छा कायमच होती. नाटकातही काम करताना किती पैसे आले, किती खर्च झाला, अशा प्रत्येकच गोष्टीत मला रस होता. त्यामुळे मी निर्मिती क्षेत्रात येणं हे लॉजिकल होतं. ही खरं तर सगळ्यात महागडी कला आहे. अगदी व्ही. शांतारामही म्हणायचे, की चित्रपट हा ८0 टक्के व्यवहार आणि केवळ २0 टक्के कला आहे. त्यामुळे हे चित्रपटाचं महत्त्वाचं अंग आहे. त्याशिवाय अनेक भाषांमध्ये काम केल्यामुळे वेगवेगळ्या भाषांतील प्रॉडक्शन हाऊसचं काम पाहिलं होतं. त्यामुळे त्यांच्या निर्मिती प्रक्रिया आणि पद्धतीबद्दल जास्तीत जास्त जाणून घेत गेलो. त्यानंतर चित्रपटाच्या व्यवस्थापनामध्ये शिरावं असे वाटले. परंतु निर्मात्याच्या भूमिकेमध्ये शिरताना त्या चित्रपटाचा एक भाग बनून सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी यात कामही करण्याचे ठरविले.

Web Title: To meet the challenge, only in the field of production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.