"प्रोडक्शनचा माणूस चुकीच्या पद्धतीने...", अश्विनी महांगडेने सांगितला मालिकेच्या सेटवरील वाईट अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:50 IST2025-05-27T12:48:20+5:302025-05-27T12:50:24+5:30
"मालिकेचा प्रोमो शूट केला आणि ती सोडली, कारण...", अश्विनी महांगडेने सांगितला तो वाईट अनुभव

"प्रोडक्शनचा माणूस चुकीच्या पद्धतीने...", अश्विनी महांगडेने सांगितला मालिकेच्या सेटवरील वाईट अनुभव
Ashwini Mahangade: 'आई कुठे काय करते', 'स्वराज्यरक्षक संभाजी', 'अस्मिता' यांसारख्या मालिकांमुळे अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हे नाव घराघरात पोहोचलं. या मालिकांमध्ये तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. अभिनेत्री अश्विनी महांगडे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. त्यात आता अभिनेत्री एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
अश्विनी महांगडने अलिकडेच 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान आलेला वाईट अनुभवांबद्दल सांगितलं. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, "मी एक मालिका केली होती ज्याचा प्रोमो शूट करुन मी ती मालिका सोडली. कारण, सेटवर प्रोडक्शनचा जो माणूस होता तो माझ्याशी खूप चुकीच्या पद्धतीने बोलला. तिथे असणाऱ्या कोणालाही त्याच बोलणं आवडलं नव्हतं. त्यावेळी मी प्रोड्यूसरला फोन करुन फक्त एवढंच सांगितलं की, 'मला वाटतं त्यांचं चुकलं कारण मी माझ्या पद्धतीने बरोबर बोललीये. त्यांनी माझ्यावर एवढं ओरडून बोलायला नको होतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की, माझं चुकलं तर मी हा प्रोजेक्ट नाही करत. त्याबद्दल तुम्ही सांगा.
पुढे अश्विनीने सांगितलं, "त्यानंतर जवळपास फोनाफोनी होऊन मी दोन तास मेकअप न काढताच बसले होते. जर मी मेकअप काढून निघून गेले असते तर की मला प्रोजेक्ट करायचा नाही. तर माझ्यामागे हेच बोललं गेलं असंत की, ती मेकअप काढून निघून गेली. त्यामुळे मी तिथे थांबले. मी म्हटलं तुम्ही मला सांगा, माझंही ऐकून घ्या आणि त्या माणसाचं ही ऐका. तुमची इतरही माणसं सेटवर आहेत, त्यांचंही ऐकून घ्या. त्यानंतर तुम्ही सांगा कोण चुकलं? आणि मग त्या माणसाने माफी मागितली पाहिजे. दोन तास मी रात्री तिथे सेटवर बसून वाट बघत होते. मी सीन वगैरे दिला नव्हता. त्यांनी बोलावलंही नाही. मग मी त्यांना पुन्हा फोन केला की तुम्हाला काय वाटतंय, मी अजून मेकअप काढला नाही. मी सेटवर थांबले आहे. त्यावर ते म्हणाले माझा माणूस चुकलेला नाही. म्हटलं ठिक आहे. मग मी तिथून निघाले."
तेव्हा थोडं थांबलं पाहिजे...
"मला असं वाटतं की त्यावेळेला जेव्हा आपल्याला खूप राग येतो. आपल्याला कळतं की समोरचा माणूस माझा अपमान करतोय जे मी सहन करु शकत नाही. आणि खूप अती बोलणं होतंय. तर थोडंसं थांबलं पाहिजे. कारण, आपण एक कलाकार आहोत. इथे सगळेच काम करण्यासाठीआले आहेत. सगळेच स्वत ला सिद्ध करण्यासाठी आले आहेत. तिथे अरेरावी करणं गरजेचं नसतं." असा खुलासा अभिनेत्रीने केला.