पुरस्कार सोहळ््यामध्ये ग्लॅमरस लुक करुन जाणारे सेलिब्रिटीज आपल्याला अॅवॉर्ड मिळावा या प्रतिक्षेत देखील ...
झी सिने अॅवॉर्ड्स मध्ये मराठी स्टार्सची धुम
/> पुरस्कार सोहळ््यामध्ये ग्लॅमरस लुक करुन जाणारे सेलिब्रिटीज आपल्याला अॅवॉर्ड मिळावा या प्रतिक्षेत देखील असतात. सर्वच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर अॅवॉर्ड सोहळे आपल्याला पहायला मिळतात. हिंदि अॅवॉर्ड फंक्शनमध्ये मराठी चित्रपटासाठी देखील विशेष पुरस्कार असतात. मग ज्या मराठी सिनेमांना नामांकने मिळाली आहेते त्या चित्रपटांचे सर्व कलाकार या पुरस्कार सोहळ््यांना उपस्थित राहतात. नूकत्याच पार पडलेल्या झी सिने अॅवॉर्डमध्ये आपल्या मराठी सेलिब्रिटीजने देखील उपसस्थिती दशर्विली आणि त्या पुरस्कार सोहळ््याला चारचाँद लावले. अमृता खानविलकरने सोशल मिडीयावर नाना पाटेकर, महेश मांजरेकर, मृण्मयी देशपांडे यांच्या सोबतच फोटो अपलोड करुम आम्ही या पुरस्कार सोहळ््यात मराठी इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करित असल्याचे अतिशय गर्वाने सांगितले. नक्कीच अमृता तुमचा अभिमान सर्व मराठी रसिक प्रेक्षकांना असेलच यात शंका नाही.