थिएटरमध्ये सैराट प्रेक्षक झाले झिंगाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 14:28 IST2016-04-30T08:58:38+5:302016-04-30T14:28:38+5:30
सैराटच्या पहिल्या प्रोमो साँगपासुनच प्रेक्षक थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर ती गाणी पाहण्यासाठी उत्सुक झाले होते. याड लागल ग याड लागल गं असो किंवा झिंग झिंग झिंगाट या गाण्यांची

थिएटरमध्ये सैराट प्रेक्षक झाले झिंगाट
झिंगाट गाण्याचे शब्द अन ताल कानावर पडताच आपोआप पाय थिरकल्याशिवाय राहत नाहीत. पण प्रेक्षकांनी तर कहरच केला थिएटरमध्ये झिंगाट गाणे चालु झाले अन सगळ््या थिएटरमध्ये एकच कल्ला सुरु झाला. प्रेक्षकांनी खुर्च्यांवर चढुन शिट््या वाजवत एकदम झिंगाट डान्स केला. एवढाच नाही तर स्टेजवर पडद्यापाशी जाऊन तरुणांनी डान्स करीत एकदमच गोंधळ घातला. हे चित्र फक्त पुण्या-मुंबईतच नाही दिसले तर महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या गावातील थिएटर्समध्ये देखील पहायला मिळाले आहे. मराठी चित्रपटाला अशा प्रकारचा मिळणारा रिसपॉन्स पाहता आपला चित्रपट दर्जेदार होतोय अन प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय हे मात्र नक्की.