​३ जून रोजी ‘युथ’ प्रदर्शित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 19:26 IST2016-05-14T13:56:30+5:302016-05-14T19:26:30+5:30

काय चाललय काय? बहुतेक मराठी चित्रपट त्यांच्या ठरलेल्या प्रदर्शित तारीखला प्रदर्शित न होता लांबणीवर का नेत आहेत? नक्की यांना ...

'Youth' will be displayed on June 3 | ​३ जून रोजी ‘युथ’ प्रदर्शित होणार

​३ जून रोजी ‘युथ’ प्रदर्शित होणार

य चाललय काय? बहुतेक मराठी चित्रपट त्यांच्या ठरलेल्या प्रदर्शित तारीखला प्रदर्शित न होता लांबणीवर का नेत आहेत? नक्की यांना भिती कशाची वाटतेय? याला कारण सैराट चा हाऊसफुल शो तर नाही?

विक्टरी फिल्म्स प्रस्तुत आणि सुंदर सेतुरामन निर्मित आणि राकेश कुडाळकर दिग्दर्शित युथ  हा मराठी चित्रपट २० मे रोजी प्रदर्शित होणार होता.  पण आता त्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून ३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 'युथ' हा पाणी समस्या या सामाजिक प्रश्नावर आधारित चित्रपट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तरुणाईंच्या दृष्टिकोनातून पाणी समस्यावर उपाय यामध्ये दाखवण्यात येणार आहे.

राकेश कुडाळकर दिग्दर्शित युथ मध्ये विक्रम गोखले, सतिश पुळेकर, नेहा महाजन, अक्षय वाघमारे, अक्षय म्हात्रे, मीरा जोशी, शशांक जाधव, केतकी नारायण आदी कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. 

Web Title: 'Youth' will be displayed on June 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.