सायली गाणार तुझ्यासवे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 14:57 IST2016-08-25T09:27:03+5:302016-08-25T14:57:03+5:30

Exculsive - बेनझीर जमादार   बॉलिवुडप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील सोलो साँगची चलती असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच गायिका आर्या आंबेकर हिचा ...

You should sing silly ... | सायली गाणार तुझ्यासवे...

सायली गाणार तुझ्यासवे...

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">Exculsive - बेनझीर जमादार
 
बॉलिवुडप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील सोलो साँगची चलती असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच गायिका आर्या आंबेकर हिचा अलवार माझे मन बावरे हा म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. तर अभिनेता सुयश टिळकचा देखील म्युझिक व्हिडीओ काही दिवसातच प्रदर्शित होणार आहे. आता, त्यापाठोपाठच गायिका सायली पकंज देखील म्युझिक व्हिडीओ करण्यास सज्ज झाली आहे. सायलीच्या टिकटिक वाजते डोक्यात या गाण्यांनी तरूणांना वेड लावले होते. आता, ती तुझ्यासवे... हे गाणे रसिकांसाठी घेऊन येत आहे. या गाण्याला सोमेश नार्वेकर याने संगीत दिले असून वर्षा भावे यांनी हे गाणे लिहीले आहे. या सिंगल व्हिडीओविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना गायिका सायली पकंज म्हणते, कोणत्याही चित्रपटात त्या चित्रिकरणाच्या परिस्थितीनुसार गाणी गायला लागतात. पण सिंगल व्हिडीओमध्ये आपल्याला पाहिजे तसं गाणं गाता येते. त्यामुळे अशी गाणी गाताना मोकळीकता मिळते. तसेच फिल्म म्युझिक हे मर्यादित क्षेत्र आहे. त्यामुळे आमच्यासाठी व्हिडीओ असो वा चित्रपटाचे गाणे  मिळालेल्या संधीचे सोने करणे हाच विचार मनात असतो. हे गाणं काही दिवसातच रसिकांच्या भेटीस येणार आहे. 

Web Title: You should sing silly ...