​भेटली तू पुन्हा या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 17:13 IST2017-03-30T11:43:26+5:302017-03-30T17:13:26+5:30

चंद्रकांत कणसे यांच्या दगडी चाळ या चित्रपटात पूजा सावंत आणि अंकुश चौधरी झळकले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद ...

You see the poster of this movie again | ​भेटली तू पुन्हा या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

​भेटली तू पुन्हा या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

द्रकांत कणसे यांच्या दगडी चाळ या चित्रपटात पूजा सावंत आणि अंकुश चौधरी झळकले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानंतर आता चंद्रकांत कणसे भेटली तू पुन्हा हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. याही चित्रपटात पूजा सावंत प्रेक्षकांना प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पण या चित्रपटात अंकुशसोबत नव्हे तर वैभव तत्तववादीसोबत तिची जोडी जमली आहे. वैभव आणि पूजा यांची जोडी प्रेक्षकांना चीटर या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती आणि आता ते दोघे भेटली तू पुन्हा या चित्रपटात झळकणार आहेत.
भेटली तू पुन्हा ही एक लव्ह स्टोरी असून जगात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही... आपल्याला फक्त साईन सापडलं पाहिजे... अशी टॅगलाइन देत हे पोस्टर चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. या पोस्टवरमध्ये केवळ नायक आणि नायिकेचे पाय आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे पोस्टर गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आले आहे. हा चित्रपट 21 जुलैला प्रदर्शित होणार असून गणेश रामदास हजारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर चित्रपटाचे लेखन संजय जमखंडी यांचं असून चिनार-महेश यांचं या चित्रपटाला संगीत लाभलंय. या चित्रपटाचे नाव आधी लव्ह एक्सप्रेस ठरवण्यात आले होते. पण काही कारणास्तव या चित्रपटाचे शीर्षक बदलण्यात आले. वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांच्यातील रोमान्स प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या टीममधील मंडळींना खात्री आहे. 




Web Title: You see the poster of this movie again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.